बोधडी आणि इस्लापूरचा भ्रष्ट वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा मागणीसाठी उपोषणाचा इशारा -NNL

सामाजीक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याचा दिला इशारा..!


नांदेड/किनवट।
मराठवाड्यातील एकमेव जंगल असलेल्या आदिवासी बहुल किनवट तालुक्यास शासनाने कायमच दुजाभाव दिलेला आहे.धरण उशाला अन कोरड घशाला या म्हणीची प्रचिती नांदेड वन विभाग कार्यालय आहे.जंगल किनवटला आणि उप वनसंरक्षक कार्यालय दिडशे किलोमीटर लांब नांदेडला म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा हा सगळा प्रकार आहे.किनवट तालुक्यात असलेल्या घनदाट जंगलाचे लवकरचं वाळवंटात रूपांतर झालेले दिसणार आहे कारण इथे आजवर कर्यारत झालेल्या सर्वच वन अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांची माया जमवलेली आहे.पट्ट्याच्या नावावर राखीव जंगलातील हजारो सागी वृक्षांची कत्तल करत त्यांची चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्री केली गेली आहे आणि आजही बिनदिक्कत पणे चालूचं आहे.

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कामे नं करताच तर कधी थातूर मातुर कामे करत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. किनवट तालुक्यातील बोधडी आणि इस्लापूर येथील भ्रष्ट वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.जाधव आणि श्री.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराची नऊ महिन्यानं पूर्वी समाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी रीतसर तक्रार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर यांच्या कडे केलेली होती ज्यावर उप वनसंरक्षक नांदेड आणि सहाय्य्क वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) यांनी चोकशी करतो याच्या नावावर नेहमीचं चालढकल करत तक्रारीला कायमचं केराची टोपली दाखवलेली होती.तक्रार बोधडी आणि इस्लापूरची तर चोकशीसाठी नांदेडला 150 किमी हजर व्हा असे तुघलकी फर्मान सहाय्य्क वनसंरक्षक नेहमीच काढत असतात.


चोकशी ही प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन करायची असते की यांच्या बंद एसी केबिन मध्ये करायची हे न उलगडलेलं कोडं आहे. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या या तुघलकी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी  आणि भ्रष्ट वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चोकशी होत नसल्याने सामाजीक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी दिनांक 4 जुले 2022 पासून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिनांक 7 जुन 2022 रोजी दिलेल्या निवेदनात केलेला आहे. 

वर्षानु वर्षे इथेच तालुक्यात कार्य करणाऱ्या वनरक्षक ते वनपाल बनणाऱ्या एका भ्रष्ट वनपालाला वारंवार इथेच पोस्टिंग का दिली जात आहे त्याला वनरक्षक नंतर वनपाल म्हणून बढती देताना शासनाच्या विविध कायद्यांचा बट्याबोल केलेला आहे या एका वनपाल वरती उपवनसंरक्षक एवढे महेरबान का ? हा संशोधणाचा विषय आहे.

वन विभाग नांदेड येथील भ्रष्ट कारभाराला औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक आणि नागपुर चे प्रधान मुख्य वनसंरक्षक व्यक्तीश लक्ष देऊन कार्यवाही करतात कि तेही या भ्रष्ट बोधडीचे वनपरीक्षेत्र अधिकारी जाधव,इस्लापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी शिंदे,सहाय्यक वनसंरक्षक लखमावाड,उप वनसंरक्षक नांदेड आणि यांचा खास वनपाल यांच्यावर्ती काही ठोस व सबळ कार्यवाही करतात कि या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न करतात हे बघण्यासारखे राहील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी