हिमायतनगर। स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. भारत सरकारच्या ९ मंत्रालये, विभागांच्या जवळजवळ १६ योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर देण्याचे यशस्वी पंतप्रधान मोदीजी यांनी संवाद साधला.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन अभियान आणि अमृत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक शिधा पत्रक, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत,पीएम जन आरोग्य योजना,आयुष्मान भारत आरोग्य आणि सास्थ्य केंद्र ,आणि प्रधामंत्री मुद्रा योजना, या व्यापक योजना,कार्यक्रमांच्या परिणामाबद्दल माननीय पंतप्रधान लाभार्थ्यांशी संवाद साधला. या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी २१००० कोटी पेक्षा जास्त रकमेच्या किसान सम्मान निधीचा ११ वा हप्ता जारी केला आहे.
उपस्थित सर्वांना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या सूचनेवरून कार्यक्रमासाठी भाजपा जिल्ह्याचे सचिव काशिनाथराव पाटील शिंदे यांच्या प्रमूख उपस्थित गरीब कल्याण संमेलन ऑनलाईन पद्धतीने यशयशस्वीपणे पार पाडण्यात आला. याप्रसंगी काशिनाथराव पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांची विचार धारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल अशी कामगिरी करूण आपण सर्वांनी यशस्वी पणे देशाचे उज्ज्वल भवितव्य कायम अबाधित ठेवण्यासाठी भाजपचे निष्ठेने काम करावे. असे अवाहन केले.
यावेळी अध्यात्मिक आघाडीचे कांता गुरू वाळके,.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, ईस्लापुर चेसोशल मीडिया शेख लतिफ, संदीप कोस्केवाड, राहुल पाटील देवसरकर, सुभाष माने, अनू जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता भाऊ शिराणे, सरपंच जीवन जैस्वाल, हिदाईत खान,विनायक ढोणे,.माधव पाटील कदम,.राम जाधव, बालाजी ढोणे, सचिन कोमावार, .अजय सुंकुलवार, गंगाधर मिरजगावे, आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.