लोहा। एसटीला 75 वर्ष पूर्ण झाल्याने लोहा बस स्थानकात एसटीचा वर्धापन दिन लहान मुलांच्या व प्रवासी यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
यावेळी कंधार आगारप्रमुख अशोक चव्हाण, वाहतूक निरीक्षक जगदीश मंडगे ,वरिष्ठ लिपिक चंद्रकांत श्रीमंगले संभाजी मठपती ,लोह्यातील वाहतूक नियंत्रक एम एम लांडगे , डी एस गायकवाड, यु बी राठोड यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राची लोक वाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली लालपरी गेल्या 75 वर्षांपासून अनेक खेड्यात पाड्यात वाडी तांड्यावर ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता निरंतर अविरत प्रवाशांची अगदी सुरक्षितपणे ने आन करत आहे. 75 व्या वर्षात या एसटीने अनेक आंदोलने , रास्ता रोको पाहिले पर्यायी अनेकदा सामाजिक संघर्षामध्ये आपल्या अंगावर दगड घेतले तरीही अशा परिस्थितीमध्ये ही एसटी निरंतर प्रवाशांना चांदा ते बांदा पर्यंत निरंतर सेवेत दाखल आहे ती आजतागायत चालू आहे
महाराष्ट्रात पहिली एसटी 1 जून 1948 रोजी नगर ते पुणे असा प्रवास तिने केला या 75 व्या वर्षात त्यात अनेक बदल होत गेले त्यामध्ये हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, मिठाई असे वेगवेगळे बदल प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाने केले आहे आज 75 व्या वर्षानिमित्त शिवाई ही इलेक्ट्रिक बस नगर ते पुणे अशी धावणार असल्याचे कंधारचे आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी सांगितले.
या निमित्ताने लोह्यातील बसस्थानकात महिला वाट एस बी श्रीमंगले यांनी आकर्षक रांगोळी टाकली होती या वर्धापन दिनानिमित्त बसस्थानकातील एसटी कॅन्टीन चे संचालक राजू कळस्कर विजय चन्नावार लक्ष्मण पवार यांच्याकडून खिचडीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसस्थानकातील गाळेधारक विजयकुमार चन्नावार, लक्षण पवार, सय्यद सिकंदर, शेख बाबामिया सफाई कामगार बाबू भाई , सुर्यकांत बंडेवार , हॉकर्स सुरज गोडबोले, शैलेश कापुरे गजू गालफाडे यांनी परिश्रम घेतले .