जिल्ह्यातील पेन्शनर्स चे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; ३७वी वार्षिक सभा संपन्न -NNL


नांदेड|
नांदेड जिल्ह्यातील पेन्शनर्स याचे विविध प्रश्न व अडीअडचणी मार्गी लावू तसेच जीवनाची दुसरी इनिग आनंदमय जगण्यासाठी या वयात ताणतणाव होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे  असे विचार मांडण्यात आले. 

नांदेड जिल्हा पेन्शनर्स असोसिशनची सर्वसाधारण ३७ वी सभा संघटनेचे अध्यक्ष इजि द.मा.रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली विजय नगर हनुमान मंदिर नांदेड येथे पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड कोषागार अधिकारी  श्री अभय चौधरी , जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना , शिक्षणाधिकारी , ( प्राथमिक ), डॉ.सौ. सविता बिरगे ,अप्पर कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे, अॅड प्रसाद रानवळकर , यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. श्री इंजि.द.मा. रेड्डी यांनी प्रास्ताविक केले व संघटनेचे सचिव ऍड चंद्रकांत जटाळ यांनी मागील सभेचे इतिवृत्तांत वाचन केले . जिल्हा परिषदमधील सेवा निवृत्तांचे मागणीचे निवेदन द. मा. रेड्डी यांनी  मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना देण्यात आले. मागण्या संदर्भात म. मिराखान यांनी सविस्तर माहिती दिली. 

मागणीचे संदर्भात श्री अभय चौधरी, कोषागार अधिकारी यांनी कोषागारातील निवृत्ती वेतनधारकांच्या अडी - अडचणी सोडविण्या बाबत सहकार्य  करण्याचे आश्वासित करले. शिक्षणाधिकारी डॉ.सौ.सविता बिरगे यांनी निवृत्ती वेतन धारकांच्या सर्व प्रलंबीत प्रकरणाबाबत लक्ष देऊन ते निकाली काढण्याचे  आश्वासन दिले. अप्पर कोषागार अधिकारी नीलकंठ  पाचंगे साहेब यांनी अडीअडचणी दूर करण्या बाबत सहकार्य करू असे सांगताना पेन्शनर्स यांनी दुसरी इनिग आनंददायी व्हावी यासाठी प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले. ऍड. रानवळकर यांनी संघटनेस कायदेविषयक बाबींचे मार्गदर्शन केले. 

दुपारी दुसऱ्या सत्रात विविध ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले . असोसिएशनचे सचिव ऍड चंद्रकांत .जटाळ यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन केले. सु.ग.चौधरी यांनी जमा खर्च सादर केला   इंजि.द.मा. रेड्डी यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमास जवळपास ४५० सभासद उपस्थित होते. सभेचे सुत्र संचलन श्री सु.ग. चौधरी यांनी तर आभार सुभाष कुरुडे यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण ३७व्या सभेच्या यशस्वीत्यासाठी , म.मिराखान, संभाजी शिंदे, शे. हुसेन चौधरी, सादीक टेंभुर्णीकर , गुलाम मुख्तार, संतुकराव भोकरे, श्री लंके, आदीनी परिश्रम घेतले .


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी