पीडित शिक्षिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू -NNL

( प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर शाळेवर कारवाई करा )


नांदेड।
सहशिक्षिका आशा माधव गायकवाड आणि केशव रामजी धोंगडे यांनी सन 1991 पासून प्रजा बालक विद्यामंदिर गांधी नगर नांदेड  येथे सहशिक्षक म्हणून कार्य केले आहे. परंतु संचालकाने या शिक्षकांचे अप्रोल काढले नाही व इतर शिक्षकांकडून देणगी स्वरूपात जास्तीचे पैसे घेऊन त्यांना कायम केले आहे.

 उपोषणार्थी शिक्षक पती-पत्नी यांनी देणगी पोटी संस्थाचालकास चार लाख रुपये रोख दिले असून संचालक मंडळाने या शिक्षकांसोबत गद्दारी केली आहे. सदरील वादग्रस्त शिक्षण संस्था ही बोगस असून नियमबाह्य पद्धतीने मान्यता मिळविली आहे. या संस्थेची मुळापासून चौकशी करावी.येथील विद्यार्थी पटसंख्या खोटी दाखविण्यात येत आहे. भरमसाठ देणगी घेऊन शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र देखील खोटे आहेत काय?  हे तपासणी करणे आवश्यक आहे. 

गांधीनगर मागासवर्गीय गृह निर्माण संस्थेच्या मोकळ्या मैदानात संस्थाचालकांच्या मुलीने व जावयाने अतिक्रमण करून पक्के घर, बंगला बांधला आहे.ते अवैध बांधकाम पाडण्याची मागणी उपोषणार्थीनी केल्यामुळे संचालकांची मुलगी, जावई, पत्नी, मुले व सून मला व माझ्या कुटूंबियांना रस्त्यामध्ये आडऊन जीवेमारण्यांची धमकी देत आहेत.असे उपोषणार्थीनी  निवेदनात लिहिले आहे.

जिल्हा परिषेदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दि.20 एप्रिल 2022 रोजी दिले आहेत परंतु अद्याप करावाई झाली नाही. आतापर्यंत दिलेल्या निवेदनातील सम्पूर्ण मागण्या सोडवाव्यात आणि अखंड तीस वर्षे शिकवीन्याचे काम केले आहे त्या कामाचा मोबदला देण्यात यावा अन्यथा उपोषण सोडणार नाही असे पीडित शिक्षिकेचे म्हणणे आहे.सदरील शिक्षिकेच्या उपोषणास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ऑफ इंडियन ट्रेड युनियन, जनवादी महिला संघटनाआणि डावी लोकशाही आघाडी चा पाठिंबा आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी