हदगावच्या वायपना बु. व ग्रामीण भागातील शेतीसाठी नविन कालवा (canal) मंजुर करा -NNL

जलसंपदा मंत्री बच्चुभाऊ कडु यांच्याकडे भ्रष्टाचार निर्मूलन समिती हदगावचे माजी तालुकाध्यक्ष शरद पाटील दुगाळे यांनी केली मागणी 


हदगाव|
हदगाव तालुक्यातील वायपना बु. व जवळपास असणारी गावे पाण्याविना असल्याने शेतातील उत्पन्न फार कमी प्रमाणात होत आहे. शेतकरी पुत्र व शेतकरी नेते या नात्याने वायपना बु. व ग्रामीण भागातील शेतीसाठी नविन कालवा (canal) मंजुर करावा अशी मागणी जलसंपदा राज्यमंत्री म. राज्य ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांच्याकडे भ्रष्टाचार निर्मूलन समिती हदगावचे माजी तालुकाध्यक्ष शरद पाटील दुगाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

सद्यस्थितीत पाण्याविना शेती करणे सोपे राहिले नाही. हदगाव तालुक्यातील उमरी (ज.), वायपना (बु.), वायपना (खु.), येवली या गावांना पाण्यासाठी नदी, किंवा कालवा (canal) अशी कोणतीच स्त्रोत नाही. त्यामुळे ही गावे पाण्यापासून फार वंचित आहेत. आपण जर यात विशेष लक्ष घातले तर कयाधु वरुन जो कालवा (canal) शिवणी, कोपरा, वाळकी बु.व खु. आणि आष्टी, बोरगाव या गावातुन गेलेला आहे. 

तो जर थोडा उमरी (ज.) मार्गे वायपना बु., वायपना खु., येवली, कांडली कडे वळवुन नविन कालवा (canal) मंजुर केला. तर आया भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल. आमच्याकडे पाण्यासाठी बोअर किंवा विहीरी शिवाय दुसरे कोणतेच स्त्रोत नाही, आम्ही शेतकरी फक्त निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून करतो आहोत असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी