खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022 कबड्डी संघ हरियानाकडे रवाना -NNL

क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून शुभेच्छा


मुंबई|
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने याहीवर्षी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र या वर्षी हॅट्ट्रीक करेन, असा विश्वास व्यक्त करून संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

हरियाना येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पदक मिळवण्याचा संघाने निर्धार केला. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे नोडल ऑफिसर आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. सोबत अन्य पदाधिकारी देखील संघासोबत आहेत. या वर्षीच्या स्पर्धेत ३७१ खेळाडू सहभागी झाले आहेत. २१ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर या स्पर्धा होत आहेत. ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल. १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.

मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.

सहभागी क्रीडा प्रकार - राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३५६ खेळाडू आहेत. खेळाचे नाव व कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४),  बॅडमिंटन (४), कुस्ती  (३३), गटका (१६), थांग ता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), अॅथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी