नांदेड| तय बाजारीची नियमबाह्य वसुली करुन मोठ्या प्रमाणात अपहार, भ्रष्टाचार करण्यात येत असल्याची तक्रार माजी स्थायी समिती सदस्या तथा नगरसेविका सौ. वैशाली देशमुख यांनी केली होती. या तक्रारीनंतरही महापालिकेने कुठलीही ठोस अशी कारवाई न केल्याने तय बाजारीची नियमबाह्य वसुली अजूनही सुरुच आहे.
मनपाच्या वतीने दैनंनिदन भाडे वसुलीचा मक्ता दि. 15 जुन 2021 पासून छ. शिवाजी स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यां. नांदेड यांना दिलेला आहे. तय बाजारी वसुलीसाठी नियम असतांना संबंधीत गुत्तेदार मनमानी पद्धतीने 30 रु 40रु 50रु असे पाच पट नियम बाह्य वसुली करत आहे. या गुत्तेदाराचा ठेका रद्द करावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी नगरसेविका सौ. वैशालीताई देशमुख यांनी केली होती तर याविषयी विरोधी पक्ष नेते यांनीही तसेच मुद्दा उपस्थित केला होता. परंतु महापालिकेने कुठलीही ठोस कारवाई न केल्याने तय बाजारीची नियमबाह्य वसुली तेही दादागिरी करत सुरु असून मनपा कारवाई केल्यानंतर अतिरिक्त रक्कम गुत्तेदाराकडून वसुल करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.