वादळी वारे सुरु असल्याने शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी दिली हिमायतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातुन किराणा माळ घेऊन धानोरा गावाकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्यास पाठीमागून तोंडावर दस्त्या बांधून आलेल्या अज्ञातानि डोळ्यात मिरची पूड टाकून किराणा मालासह नगदी रक्कम लुटून नेल्याची घटना दि.१२ में रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेबाबत शेतकऱ्याने पोलिसांना फिर्याद दिली असून, वृत्त लिहीपर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १२ में रोजीचे सायंकाळी हिमायतनगर तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी संभाजी उर्फ बाबूराव परमेश्वर इठेवाड वय ४० वर्ष हे हिमायतनगर शहरात किराणा सामानाच्या खरेदीसाठी आले होते. सामान खरेदी करून तेलाचा डब्बा घेऊन रात्रीला ८.३० वाजेच्या सुमारास शायमालाला जयस्वाल यांच्यासोबत धानोरा गावाकडे जात होते. दरम्यान बोरगडी गावाच्या जवळ ढोणे यांच्या शेताजवळ पाठीमागून भरधाव वेगात एका दुचाकीवर तिघेजण बसून आले. त्यांनी तोंडाला दस्ती बांधलेली होती. यांनी दुचाकीसमोर येऊन गाडी थाम्बवली आणि काही कळण्या अगोदर दोघांच्या डोळ्यात मिरचीची पुढी टाकून तुमच्या जवळ काय आहे ते दे... असे धमकावत असल्याने मारण्याच्या भीतीने आमच्या जवळील जे आहे ते घ्या पण मारू नका अशी विनवणी केली.
या बातम्यावर सुद्धा एक नजर टाका
त्या अज्ञात चोरटयांनी दुचाकीस्वारांजवळ असलेले १० हजार रुपये, बेगमधील २ हजार रुपये आणि १५ किलोच्या तेलाचा डब्बा अंदाजे २२०० रुपये हिसकावून घेऊ चोरटे पसार झाले. दरम्यान याचा वेळेत हिमायतनगर शहरासह तालुक्यात विजांचा गडगडाट, वादळी वारे आणि पावसाळा सुरुवात होत असल्याने झालेल्या घटनेच्या भीतीमुळे थेट गाव गाठले त्यामुळे त्याचा वेळी फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊ शकले नाही. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आपली डोळ्यात मिरची पुढं टाकून लूटमार झाली असल्याची तक्रार दिली आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या मागील महिन्यात पोटा जवळील गावाच्या ठिकाणी सुद्धा एक खाजगी कंपनीच्या फिल्ड ऑफिसरला भर दुपारी मिरची पूड टाकून लुटण्यात आले होते. त्यानंतर २० दिवसांनी हिमायतनगर तालुक्यातील एका शेतकऱ्यास मिरची पूड टाकून लुटण्यात आले आहे. या घटनेमुळे शहराकडे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकात भीती निर्माण झाली आहे. या घटनेचा तपास लावून पोलिसांनी लूटमार करणाऱ्या अज्ञात चोरट्याना जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे.