जिल्हाधिकारी विपीन ईटणकर बुद्ध प्रभात संयोजन समितीच्या कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित -NNL


नांदेड। 
बुद्ध प्रभात संयोजन समितीच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांना बुद्ध जयंतीदिनी कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जगभर कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना नांदेड जिल्ह्यात या महामारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर आपले माणूस म्हणून असलेले कर्तव्य बजावताना जिल्हाधिकारी ईटणकर यांना नांदेडच्या नागरिकांनी बघितले आहे. कुठल्याही अविर्भावाशिवाय 24 तास यामहामारीत उपलब्ध असणारा अधिकारी म्हणून ईटणकर यांना ओळखले गेले. 

सकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी रात्रभर ईटणकर यांनी कोरोना काळात काम केले असून त्यांच्या व त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने नांदेड जिल्ह्यात कोरोना महामारीला आळा घालता आला. जगभर हाहाकार माजवलेल्या या महामारीने नांदेडात सुरुवातीच्या काळात आपले जाळे पसरायला सुरुवात केले होते. परंतु सक्षम आरोग्य यंत्रणा व त्याचबरोबर इतर आवश्यक असणाऱ्या शासकीय यंत्रणा यांचा योग्य वेळी वापर करून दिवस-रात्र सेवा बजावत नांदेड जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून या महामारीचा सामना केला.

 त्यात जिल्हाधिकारी ईटणकर हे एक पाऊल पुढे होते. तरुण तडफदार असलेल्या या अधिकाऱ्याने याकाळात दाखवलेली माणुसकी व कर्तव्याची चुणूक ही वाखाणण्याजोगी होती. म्हणूनच नांदेड जिल्ह्यातील अनेक कोरोना रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अशा जिंदादिल व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने ज्येष्ठ पत्रकार विजय निलंगेकर यांच्या पुढाकाराने बुद्ध प्रभात संयोजन समितीने विपिन इटनकर यांना कोरोणा योद्धा हा सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरविले. बुद्ध जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात आयोजित केलेल्या बुद्ध प्रभात कार्यक्रमात त्यांना सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले. मात्र कामाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. 

माझे कामच माझा पुरस्कार आहे आणि आपण घेतलेल्या नोंदी बद्दल मी आपला आभारी आहे. अशा शब्दात संयोजन समितीचे इटणकर यांनी आभार मानले व बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र समितीने त्यांची वेळ घेऊन त्यांच्या निवासी जाऊन त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. रात्रंदिवस कर्तव्या पलीकडे जाऊन माणुसकी जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्दात हेतूने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. जगभर बौद्ध धर्माचा प्रसार करणारे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांचे जीवनचरित्र ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी ईटणकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक विजय निलंगेकर यांच्यासमवेत मुख्य संयोजक निहाल निलंगेकर संयोजन समितीचे अध्यक्ष संपादक श्याम कांबळे पत्रकार कुंवरचंद मंडले, सुनील कांबळे, दीपंकर बावस्कर आदींची उपस्थिती होती. बुद्ध प्रभात संयोजन समितीने दिलेल्या पुरस्काराने माझ्यासोबतच इतर अधिकाऱ्यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल. बुद्ध जयंती दिनी मिळालेला हा सन्मान अविस्मरणीय आहे. अशा शब्दात जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी या पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी