मालेगाव/नांदेड। मागील काही वर्षांमध्ये मालेगाव व परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या परिस्थिती मध्ये मालेगाव येथे पोलिसांचे दूर शेत्र आहे त्यात सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहेत. परंतु या पोलीस चौकी वर मोठ्या तब्बल 18 गावांचा पदभार आहे.
तसेच अनेक छोटे मोठे गाव यामध्ये समाविष्ट आहे विशेष म्हणजे मालेगाव दूर क्षेत्राच्या अगदी बाजूलाच कुरूंदा पोलिस स्थानक व वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दी आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेला नांदेड वरून औरंगाबाद परभणी हिंगोली जाणारे वाहनांची वर्दळ नेहमीच असते याचाच फायदा घेत मागील तीन वर्षांमध्ये शेकडो लुटमारीचे प्रकार तरोडा नाका ते वसमत हद्दीपर्यत मालेगाव चौकीच्या कार्यक्षेत्रात झालेले आहेत.
अपुरे मनुष्यबळ तसेच पोलिस चौकीला चार चाकी वाहन नसल्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवता येत नाही तसेच अकार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यां मुळे मालेगाव परिसरात गुन्हे घडन्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे नांदेड शहरामध्ये नवीन आयुक्तालय करण्याची घोषणा केल्यानंतर मालेगाव परिसरातील नागरिकांनी सुद्धा मालगाव येथे पोलिस स्थानक निर्माण करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
मागे अनेक वेळेस प्रशासकीय पातळीवर पोलीस स्थानका निर्माण करन्यासाठी अहवाल मागवन्यात आला होता. आत्ता आयुक्तालयाच्या घोषनेमुळे पोलीस स्थानकाची मागणी जोर धरु लागली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळ पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना सुद्धा भेटणार असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे मालेगाव पोलीस ठाणे निर्माण झाल्यास मालेगाव परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील यात मात्र शंका नाही.