पार्डी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध -NNL

चेअरमनपदी पंजाबराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी कैलास भांगे


अर्धापूर, निळकंठ मदने।
तालुक्यातील पार्डी म येथील सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून, चेअरमनपदी पंजाबराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी कैलास भांगे यांची निवड करण्यात आली, नवनियुक्त पदाधीकाऱ्यांनी सभासदांचे आभार मानले.


अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निवड झाली, मंगळवारी ३१ मे ला चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ए एम केद्रे व सहाय्यक निवडणूक अधिकारी सखाराम पाटील पवार यांनी विशेष बैठक बोलावली होती, यावेळी  चेअरमन पदासाठी पंजाबराव देवीदासराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदासाठी कैलास विठ्ठलराव भांगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले,त्यामुळे ही निवडणूक परंपारीक पध्दतीने बिनविरोध पार पडली,संचालक मंडळांमध्ये मारोतराव देशमुख, निळकंठराव मदने, विठ्ठलराव देशमुख, नारायणराव देशमुख,मनोज देशमुख,रवी देशमुख,भगवानराव साबळे, शामराव मरकुंदे,सौ.जिजाबाई भाऊराव हापगुंडे,सौ.मंगलाबाई दिगंबरराव भांगे,धोंडीबा गायकवाड,यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीचे स्वागत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदाशिवराव देशमुख,हासनराव मदने, गंगाधरराव देशमुख, नागोराव भांगे पाटील,सटवाराव हापगुंडे, बाबूराव देशमुख,हनुमंत देशमुख,जितेंद्र देशमुख,बाबूराव साबळे,अविनाशराव देशमुख,शंकर हापगुंडे,नंदकिशोर देशमुख,गणेश शिखरे,शिवाजी देशमुख,श्याम गीरी,ज्ञानेश्वर दहिभांगे,महेश देशमुख,भरत हापगुंडे,बंडू मदने, विठ्ठलराव देशमुख,देविदास कांबळे, यांच्यासह आदिंनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी