नविन नांदेड। हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हनुमान जन्मोत्सव समिती सिडको नांदेड विश्व हिंदू परिषद, बंजरग दल यांच्या वतीने आयोजित संजिवनी सत्संग भजन मंडळ व्दारे सुप्रसिद्ध गायक विकास परदेशी यांनी हनुमान व श्रीराम यांच्या वर आधारित अनेक धार्मिक गाणे भजन गायन करून ऊपसिथीत भाविकांची मने जिंकली.
शिवलिंगेशवर मंदिर देवस्थान येथे १७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विहिंप जिल्हा मंत्री शशिकांत पाटील,भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कांचनगिरे,धिरज स्वामी,मोहन पाटील घोगरे, भगवान बारसे, पिंटू महाराज, अक्षय मुपडे,नवनाथ कांबळे,यांच्या सह सामाजिक ,पत्रकार ,व विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षापासून विश्व् हिंदु परिषद बजरंग दल सिडको हडको मध्ये विविध धार्मिक कार्य करत गौरक्षण, विविध भागात महाआरती, नंतर भजन, हिंदू एकत्रिकरण कार्य चालते तसेच यंदा कल युगाचे भगवान श्री रामभक्त हनुमानजी यांचा जन्मोत्सव भव्य दिव्य भजन संध्या द्वारे साजरा करण्यात आला, यावेळी नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक विकास परदेसी,गणेशसिंह ठाकूर,विहीप शहर मंत्री गणेश कोकुलवार,मठ मंदिर प्रमुख गजानन सिंह चंदेल, बजरंग दल सह संयोजक सचिन वानोळे,विशाल शर्मा,शुभम गोपीनवार, ,महेश सुर्यवंशी,साई भांडे,वामसी पाचनुरे,सुशिल पेडगुळवार ,अभिषेक कटकुळे,ओकांर जोशी, शंतनु कचवे,कृष्णा ऊदावत, ग्यानी ठाकूर, वैभव दरब्बसतवार,विशाल तुमा, कन्हैया ठाकूर,यां गायका संच असलेला श्री संजीवनी सत्संग भजन मंडळ नांदेड यांंचा व्दारे हिंदी, मराठी विविध धार्मिक भक्ती गीते,भजन व राम वनवासावर आधारित गिते गायली, कार्यक्रमाचे आयोजक तुम्ही आणि आम्ही श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको व विश्व् हिंदु परिषद बजरंग दल, वाल्मिकी प्रखंड सिडको यांनी केले होते, यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.