खा. चिखलीकर यांच्या हस्ते ढाकणी -वडेपुरी-हरबळ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; वडेपुरी येथे मोठी गर्दी -NNL


लोहा|
वडेपुरी या भागाचे नेहमीच चिखलीकर कुटुंबियांना साथ दिली आहे. या भागाचे नेहमीच कठीण काळात पाठींबा दिला आम्ही त्यातून उतराई होण्यासाठी कामे करत असतो ढाकणी - वडेपुरी -हरबळ रस्त्यामुळे आणखी या भागात सोयीचे होणार आहे. ज्यांना आमच्या शब्दावर निवडणून दिले  त्याच्या  विषयी काय बोलावे (?) आता पुन्हा अशी चूक होणे नाही विकास कामांसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

पंतप्रधान सडक योजने अंतर्गत लोहा मतदार संघातील ढाकणी  -वडेपुरी- हरबळ या रस्त्यांचे कामाचा शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरबळ देवस्थान मठाचे सामगीर महाराज होते. व्यासपीठावर प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम  भाजपाचे तालुकाध्यक्ष माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, उपसभापती बळीराम पाटील जानापुरीकर, माजी सभापती शंकर पाटील ढगे, भाजपचे जुने पदाधिकारी माजी सभापती सदाशिव अंबुरे, दळवे, इंजि. पाटील, बीडीओ शैलेश वाव्हूले, आशीर्वाद कन्ट्रक्शनचे शिवाजीराव देशमुख,,सपोनि भोसले आदी उपस्थित होते.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, वडेपूरी सर्कल व चिखलीकर कुटुंबाचे संबंध आहेत वडेपुरीकरांनी मला संधी दिली विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. वडेपुरी वासियांमुळे जिल्हा बँकेचा चेअरमन होण्याची संधी मिळाली. आता कोणताही पक्ष राहिला नाही तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात. सर्वांना मला मतदान दिले आम्ही ज्याला मतदान मागितले त्याला ही मतदान दिले. पण आपण जे पेरणीला बियाणे पेरले ते बोगस निघाले असा टोला आ. श्यामसुंदर शिंदे यांचे नाव न घेता खा. चिखलीकरांनी लगावला. 

लोहा मतदार संघात निवडणूक लढवून आमदार होण्याचे अनेक जण स्वप्न पाहत आहेत पण या  मतदारांनी भल्या भल्याना त्यांची जागा दाखविली आहे. येथे निवडणूक लढविणे काम  काही येड्या गबाड्याचे नाही. पैसा आहे म्हणून कुणीही निवडणूक लढविली तर चालेल का नाहीतर टाटा, बिर्ला ही निवडणूक लढविले असते.या मातीशी नाळ जोडणाऱ्या त्याच्या सुख दुःखात धावून जाणाऱ्यांना येथील मतदारांनी नेहमीच साथ दिली आहे. 

वडेपुरी परिसरासाठी आम्ही काय केल व त्यांनी काय केलं यांची नोंद मतदार निश्चित ठेवतील डेरला ते किवळा रस्ता, वडेपुरी ते हरबळ, वडेपुरी ते ढाकणी जोडण्याचे काम आम्ही पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत सुरु केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ३८४ कि. मी. नॅशनल हायवे चे काम या विभागात सुरू केले. ना.नितीन गडकरी यांनी त्याससाठी तरतूद केली. २५५२ कोटी चे नांदेड -बिदर रेल्वेचे काम होणार आहे नांदेड -लातूर रेल्वेचे काम ही माझ्या काळातच व्हावे यासाठी प्रयत्न आहेत  असे खा. चिखलीकर म्हणाले

वडेपुरीचे माजी सरपंच चांदोजी पाटील दळवे, ग्राम विकास अधिकारी शिंदे, दापशेडचे सरपंच वीरभद्र राजूरे, विठ्ठल सोनकांबळे यांच्या सहीत वडेपुरी, जानापुरी, ढाकणी, किवळा, मारताळा, टेळकी सह परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी