लोहा| जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने ब लोहा शहरात शांती मार्च कँडल रॅली काढण्यात आली .बुद्धम शरणम गच्छामि ..म्हणत उपासक उपासिका या मिरणुकीत सहभागी झाले होते.
सकाळी सहा वाजता क्रांतीसुर्य बुद्ध विहार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे अध्यक्ष एस.एन. शिनगारपुतळे,नांदेड जिल्ह्याचे पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे ,धोंडीबा यानभुरे यांच्या कडून सुत्र पठण करण्यात आले. जुन्या लोह्यातील त्रिरत्न बुद्ध विहारात भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्प पूज करण्यात आली.आणि संध्याकाळी खिरदान वाटप करण्यात आले.सायाळ रोड येथे प्रथमच तेथील बौद्ध बांधव यांनी मोठ्या उत्साहात बुद्ध जयंती साजरी केली यावेळी , मोठ्या प्रमाणात महीला उपस्थित होत्या.
ज्ञानदिप बुद्ध विहारात बुद्ध प्रतिमेची पुष्प पूजा करून संध्याकाळी खिरदान वाटप करण्यात आले. रात्री आठ वाजता क्रांतीसुर्य बुद्ध विहार येथुन भव्य अशी शांतता धम्म ज्योत मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक बसस्थानक-पोलिस स्टेशन मार्ग--भाजी मंडई परत क्रांतीसुर्य बुद्ध विहार याठिकाणी विसर्जित करण्यात आली. लोहा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक रेखा काळे, गुप्तहेर विभागाचे सचिन गिरे,शेंबाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे लोहाचे तालुका सरचिटणीस बापूसाहेब कापुरे यांनी धम्मवंदना घेतली . उपस्थितांना खिरदान वाटप करण्यात आले.