नांदेड, आनंद बोकारे| नवज्योत फाउंडेशन तर्फे आयोजित चौदाव्या संस्कार शिबिरांमध्ये प्राध्यापक डॉ.राजवंतसिंह यांनी स्क्रीन म्हणजेच मोबाईल स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप इत्यादी पासून मुलांच्या जीवनावर होणार्या दुष्परिणाम बद्दल अतिशय व्यवस्थितपणे उदाहरणासहित व्याख्यान दिले. त्यावेळेस त्यांनी मुलांना अति स्क्रीनचा वापर केल्याने काय काय दुष्परिणाम होतात याची उदाहरणासहित माहिती दिली.
तसेच याचा वापर कमी करण्यासाठी सर्वांची सामुदायिक जबाबदारी व पालकांची सुद्धा जबाबदारी अति महत्त्वाची आहे, असे यावेळेस प्रा.डॉ.राजवंतसिंह यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमास नवज्योत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरदार नऊनिहाल सिंघ जागीरदार, कार्यकारी अध्यक्ष सरदार सज्जनसिंग सिद्धू, परमज्योतसिंग चाहेल, रणजीतसिंग कामठेकर, कुलप्रकाशसिंग ग्रंथी व नवज्योत फाऊंडेशनचे सर्व सदस्य तसेच जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते.