लोहा| लोहा नगर पालिकेच्या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवारी( ११मे) निवड प्रक्रिया पार पडली. ऐनवेळी दता वाले याना संधी देण्यात आली. पण निष्ठावंत कार्यकर्ता असलेले करीम शेख यांचे अंतिम क्षणा पर्यन्त नाव चर्चेत होते पण पुन्हा एकदा त्यांना उपनगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली. त्यांना डावळल्याने कार्यकर्त्यांत मोठी नाराजी पसरली तर आगामी राजकारणाचा विचार करून निर्णय घेण्यात आला असावा .
करीम शेख हे खा चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून या मतदारसंघासह जिल्ह्यात परिचित आहेत.त्यांनी २००८मध्ये माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या बंधूचा पराभव करून संपूर्ण तालुकासह जिल्ह्याचे लक्ष वेधले होते २०१८च्या नगर पालिकेत पुन्हा त्यांनी लक्षवेधी निवडणुकीत विजय मिळविला. फुटीरतेचे" तिळगुळ" घ्यायला तयार झालेल्या परिस्थिती करीम शेख यांनी आपली निष्ठा चिखलीकर कुटुंबियांवर वर कायम ठेवली. भाजपचे गटनेते म्हणून ते सभागृहात आहेत. मार्च महिन्यात शरद पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी घडलेल्या घडामोडीत करीमभई यांचे परेशनी आणि एकनिष्ठता वाखाण्याजोगी होती.आज ही त्यांना हुलकावणी दिली तरी त्यांनी प्रतापराव पाटील व प्रवीण पाटील यांचाच आदेश मानला .श्रद्धा कशी असते ते करीम भाई यांनी पुन्हा एकदा दाखविले पण कंधार मध्ये जे कृत्य केले तेच लोह्यात करणाऱ्या पासून वेळीच सावधान होण्याची वेळ आहे सर्व गोपनीयता विरोधकांना माहिती होतात हीच मोठी अडचण आता हलबलता झाली की काय असा सूर निष्ठावंतात उमटत आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी त्याची दावेदार प्रबळ मानली जात होती. त्यांच्या सहीने नगराध्यक्षासह भाजपच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) देण्यात आला होता.सभागृहात जाई पर्यन्त त्याच्या नावाचा लिफाफा असेल असे वाटत असतानाच दता वाले यांचे नाव पक्ष श्रेष्ठीने जाहीर केले आणि करीम शेख समर्थकात अस्वस्थता पसरली. करीम भाई यांचा स्वभाव तसा मृदू ..सध्या नगर पालिकेत सत्ताधारी भाजपाची जी परिस्थिती आहे ते पाहता पुन्हा ते सतेत येणे तसे कठीण वाटते .दीड वर्षा नंतर होणाऱ्या निवडणूकीत काय परिस्थिती असते यावर खूप काही अवलंबून आहे. सध्याचा नगर पालिकेची आजची स्थिती एकाधिकारशाही ची आहे. जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज होती पण तसे झाले नाही आणि ज्या आशेने लोकांनी भरभरून मते दिली त्यांचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भ्रम निराश झाला आहे.
लोहा कंधारच्या मार्गावर दिसतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्या समोर ठेवून जातीय समीकरणच विचार करीत दता वाले याना संधी मिळाली असावी .पण हे होतानाच एक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भ्रम निराश झाला. शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे प्रभावीपणे मांडले नाही.वेळ निघून गेल्यावर त्यावर निर्थक चर्चा सुरू आहे पण आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे नाव पुढे रेटण्याची गरज कदाचित या प्रमुखांना वाटली नसावी.पण करीम शेख याना मानाचे पद आहे त्यांनी संयम व श्रद्धा ठेवावी.सबुरी नंतर गोड फळ असते.
क्षणिक वाईट वाटणे साहजिक पण राजकारणात कधी संधी मिळेल हे सांगता येत नाही त्यांना खा चिखलीकर यांनी अंत्यत महत्वाची म्हणजे गटनेत्याची विश्वासाने जबाबदारी दिली आहे पुढे योग्यवेळी त्यांना संधी मिळेल .पण तूर्तास त्यांना उपनगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली.श्रद्धा व सबुरी हे राजकारणात महत्वाचे असते.पुढे योग्य वेळी योग्य संधी करीम भाई यांना मिळेल एवढे निश्चित .
प्रवीण पाटील चिखलीकर यांनी लोह्याचे दोन्ही प्रकरण सुलभतेने हाताळले.त्यांनी सगळ्या संभाव्य अडचणी पडताळून पाहत नवीन समीकरणे जोडण्याची तयारी केली होती. युवा कार्यकर्ते सचिन मुकदम व त्याचे सहकारी यांनी मार्च महिन्यात अतिशय चोखपणे जबाबदारी पार पडली.