नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्रा. डॉ. चंद्रकांत ढवळे, प्रा. डॉ. संजय पेकमवार, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. सरिता यन्नावार, उद्धव हंबर्डे, धानोरकर दुर्गादास, बंडू कांबळे, हरीश पाटील, नारायण गोरे, संतोष हंबर्डे, अरुण इंगोले, प्रमोद हंबर्डे, रामदास खोकले, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.