नांदेड। शनिवारी सुरू होणाऱ्या नरेंद्र - देवेंद्र महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून नवा मोंढा मैदानावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते व्यासपीठाचे पूजन करण्यात आले असून डॉ. सचिन उमरेकर व धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वात शहरात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली.
व्यासपीठ पूजनाच्या वेळी संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, नरेश आलमचंदानी,चक्रधर खानसोळे हे उपस्थित होते.
कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या या महोत्सवातील 14 मे रोजीच्या दहाव्या मराठी हास्य दरबार या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी आमदार अतुल सावे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सतीश सुगमचंदजी शर्मा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
तर 15 मे रोजी होणाऱ्या अखिल भारतीय विराट कविसंमेलनाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंघजी, रामदास पाटील सुमठाणकर, डॉ.अजित गोपछडे, संजय कौडगे, दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दिपकसिंह रावत, मिलिंद देशमुख, बालाजी शिंदे मरळककर, शिवराज पाटील माळेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरू असलेल्या या महोत्सवात देशभरातील नामांकित कवींची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये पुणे येथील बंडा जोशी, सातारा येथून अनिल दीक्षित, अहमदनगरचे भालचंद्र कोळपकर, परभणीचे हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे, स्थानिक कवी शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवाड आणि विडंबनकार श्रीनिवास मस्के हे हास्य दरबार मराठीतून हास्याचे फवारे उडविणार आहेत. तर हिंदीच्या अखिल भारतीय कविसंमेलनात जबलपूर येथील हास्य गीतकार सुदिप भोला, साजापूर येथील हास्य व्यंगाचे कवी दिनेश देसी घी, भोपाळ येथील शृंगार रसाचा कवयित्री सबिया असर, इंदोर येथील वीर रसाचे कवी मुकेश मोलवा, कोटा येथील राजेंद्र पवार आणि नागपूर येथील हर्ष व्यंगाचे कवी कपिल जैन हे आपल्या रचना सादर करणार आहेत.
या महोत्सवास वेळेवर उपस्थित राहणाऱ्या 10 रसिकांना सोडतीद्वारे रंगीत टीव्ही मिळणार आहे. दरम्यान दिग्गज नेते, मान्यवर आणि हजारो रसिकांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या महोत्सवात अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा नांदेड भूषण आणि सुधाकर पत्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. नांदेड भूषण पुरस्कारांमध्ये डॉ.हंसराज वैद्य, सरदार नवनिहाल सिंघ जहागीरदार, अॅड. मिलिंद एकताटे, दिलीप मोदी यांचा समावेश आहे. तर सुधाकर पत्र भूषण पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, देशोन्नतीचे आवृत्ती संपादक अनिल कसबे, ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी आणि कालिदास जहागीरदार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.देशातील सर्वात मोठे कवी संमेलन म्हणून ख्याती मिळविणाऱ्या या नरेंद्र देवेंद्र महोत्सवास रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.