शिवणीच्या जि.प.हायस्कूल ला आता तरी शिक्षक द्या- पत्रकार संघाचे सचिव प्रकाश कार्लेवाड -NNL

मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे गणित व हिंदी विषयाचे अनुभवी शिक्षक देण्याचे निवेदन

आदिवासी भागातील शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व्हावे या उद्देशाने शासनाच्या वतीने विविध योजना राबवून आदिवासी भागातिल विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आनण्यासाठी विविध स्थरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र आदिवासी भागातील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती होऊन देखील  शिक्षक शाळेवर रुजू न होता आडमुठी पणा वापरात आदिवासी भागातील विधार्थयांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होताना दिसून येत आहे.करिता सध्या समुपदेशन होत असलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या बदल्यात शिवणीच्या जि.प. हायस्कुल ला गणित व हिंदी विषयाचे शिक्षक देऊन आदिवासी भागातील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे,अन्यथा शिक्षक मिळेपर्यंत जि.प.नांदेड येथे उपोषण करण्यात येईल असा इशारा मराठी पत्रकार संघाचे किनवट तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड शिवणीकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांना लेखी निवेदन २३ मे सोमवार रोजी दिले आहे.


शिवणी/नांदेड।
किनवट तालुक्यातील शिवाणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल ला मागील २० वर्षांपासून गणित व हिंदी विषयाचे शिक्षक नसल्याने आदिवासी बहुल भागातील मागील अनेक वर्षात विध्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होताना दिसून आले.या करिता मागील वर्षी ३० जुलै २०२१ पेसा अंतर्गत शासन निर्णयान्वे सेवा जेस्टते नुसार  गणीत व हिंदी विषयाचे अशा दोन शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश देत माध्यमिक शिक्षक बदल्यात मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांनी आदिवासी बहुल भागातिल सर्व रिक्त जागा भरून अनुशेष पूर्ण केले होते.

या माध्यमातून जि.प.हायस्कुल शिवणी येथे रिक्त असलेले पूर्ण जागा भरून गणित व हिंदी विषयाचे दोन शिक्षण रुजू होणे अपेक्षित हिते.पण त्या दोन शिक्षक अनेक महिने उलटून सुद्धा  जि.प हायस्कूल ला रुजू न झाल्याने या संदर्भात येथील शिक्षण समितीचे अध्यक्ष संग्राम बिरकुरे,प्रा.शाळा व्यस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भोजराज देशमुख व मराठी पत्रकार संघाचे किनवट तालुक्याचे सचिव प्रकाश कार्लेवाड व तंटामुक्ती अध्यक्ष बालगंगाराम भुशिवाड यांनी व गावातील शिक्षण प्रेमी आणि पालक सह गावातील अनेकांनी ते दोन शिक्षक रुजू व्हावे यासाठी गेल्यावर्षीच्या पंचायत राज समिती चे मुख्य असलेले आमदार काळे,महाराष्ट्र राज्याचे  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व जि.प.नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा शिक्षण अधिकारी नांदेड यांना वेळोवेळी निवेदन देऊन त्या दोन शिक्षकांना शिवणीच्या  हायस्कूलला रुजू होण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

परंतु त्या शिक्षकांच्या अडमुठी धोरणामुळे शिक्षक रुजू झाले नाही.तर यासंबंधी एका महिला शिक्षकाला निलंबित ही करण्यात आले होते.तर दुसरे शिक्षक अनेक महिन्यानंतर १३ ऑक्टोबर २०२१ रोजी शाळेवर येऊन नियुक्ती पत्र घेतले. मात्र त्या नंतर त्या शिक्षकाने सुद्धा  शिवणी च्या हायस्कुल कडे वळून ही पाहिले नाही.तर संपूर्ण शैक्षणिक वर्ष संपून सुद्धा हे शिक्षक हायस्कुल कडे फिरकले सुद्धा नाही.तर परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षकाभावी शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून आगामी शिक्षण सत्र १२ जून रोजी जिल्हातील शाळा सुरू होणार आहे.

 या संदर्भात सध्या जि.प.विभाग नांदेड च्या वतीने समुपदेशनाने माध्यमिक शिक्षकांचे जिल्हा बदल्या होत असल्याने जि.प.हायस्कूल शिवणी येथे मागील नियुक्ती केलेल्या त्या शिक्षकांची हकालपट्टी करून गणित व हिंदी विषयाचे शिक्षक द्यावे ह्या साठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे जिल्हा शिक्षण अधिकारी नांदेड यांना पुनः आता तरी शिक्षक द्या आशा प्रकारचे निवेदन दि.२३ मे २०२२ रोजी मराठी पत्रकार संघाचे किनवट तालुका सचिव प्रकाश कार्लेवड यांनी दिले असून या वेळी मात्र शिक्षण विभाग जि.प.नांदेड कडून जि.प.हायस्कूल ला जर शिक्षक मिळाले नाही तर.शिक्षक मिळेपर्यत जि.प.कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.तर सध्या होत असलेल्या समुपदेशन बदल्यात आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल की शिक्षण प्रेमींना उपोषणाला बसावे लागेल या कडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी