उच्चशिक्षित दिव्यांग मुलीने कामगार दिनी केला, कामगार मुलासोबत सत्यशोधक पद्धतीने विवाह -NNL

कामगार वर्गातून होत आहे विवाहाचे कौतुक


नांदेड।
शहरातील गांधी नगर येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन तथा महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजी सायंकाळी सहा वाजता कौतुकास्पद विवाह सोहळा पार पडला आहे.

 गांधीनगर येथील सौ.मंजुळाबाई व महादेव गायकवाड यांची कन्या अंबुताई ही उच्चशिक्षित असून बीएससी ॲग्री सह एम. एस.डब्ल्यू. पर्यतचे उच्च शिक्षण तिने घेतलेले आहे. तर मुलगा संतोष आनंदा खडसे हा केवळ इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण घेतलेला मुलगा आहे. संतोष खडसे हा राहणार मेथा तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मिळेल ते काम करणारा कामगार आहे.

मागील आठवड्यात वर मुलाकडील मंडळी नांदेड येथे मुलगी पाहण्यासाठी आले होते. तेव्हा दोन्हीकडील कुटुंबाची पसंत पारख झाल्यानंतर लग्न जुळले व लवकरच लग्न करावे असा प्रस्ताव मुलाकडील मंडळींचा होता. परंतु मुलीकडील कुटुंबीय लग्न धुमधडाक्यात करण्याच्या तयारीत असताना नवरी मुलीने एक मे तारीख निश्चित करण्याचे घरच्याना सुचविले व घरी पुरोगामी व कम्युनिस्ट वारसा असल्यामुळे एक मे ला कामगार दिवशी लग्न करण्याचे  निश्चित झाले. 

वधू मुलगी स्वतः समाजकार्य विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेली असल्यामुळे महात्मा फुले  यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचे ठरले आणि सायन्स कॉलेजचे उप प्राचार्य प्रा. डॉ.लक्ष्मण शिंदे व यशवंत कॉलेजचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. महेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मार्फत लग्न विधी पार पाडून विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह मंडपामध्ये म. फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, माता सावित्री फुले आदीं महामानवांच्या प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन करून विवाह संपन्न झाला. चार वर्षापूर्वी वधूच्या भावाचा विवाह असाच सत्यशोधक पद्धतीने गांधीनगर मध्ये करण्यात आला आहे. 

वराकडून सौ. सुंदूबाई व कचरू खडसे, काजल व सुनील खडसे, सौ.सत्वशिला व फकीरा खडसे आणि बंडू सावळे असे मोजकेच पाहुणे उपस्थित होते. वधू कडून सौ.मंजुळाबाई व महादेव गायकवाड, सौ.रत्नमाला व फकिरा गायकवाड, श्री सदाशिव शेषराव भिसे, सौ मनीषा व उत्तम धोंगडे, सौ ज्योती व शंकानिरसन गायकवाड, सौ. मीना व दयाशील गायकवाड, सौ. छाया व कपिल गायकवाड, सौ. सायली व विशाल गायकवाड, गंगासागर केरबाजी गायकवाड, सौ. रूपा गजानन गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड, कॉ. मारुती केंद्रे, ऋषिकेश धोंगडे यांच्या सह माकपा चे कार्यकर्ते कॉ. लता व कॉ.गंगाधर गायकवाड आदींची उपस्थिती होती.

वधु अंबुताई महादेव गायकवाड ही सिटूचे जनरल सेक्रेटरी तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची बहीण असून, उच्चशिक्षित असलेल्या मुलीने कामगार दिनी कामगार मुलासोबत सत्यशोधक पद्धतीने केलेला विवाह निश्चितच येणाऱ्या बेरोजगार पिढीसाठी प्रेरणा देणारा असणार आहे असे मत लग्नामध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी