आरोपींना अटक करण्याची मागणी
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ता . कंधार येथील बसस्टॅडवरील रोडच्या कडेला आसलेल्या नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील फोटोची काही समाजकंटका कडून दि.७ मेच्या मध्येरात्री विटंबना केल्याबद्दल उस्माननगर पोलिस ठाण्यात बसव प्रेमीकडून एका निवेदनाव्दारे जाहीर निषेध व्यक्त करून संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उस्माननगर येथील अनेक वर्षांपासून बस स्डॅडवरील रोडच्या कडेला असलेल्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील फलकाला लावलेल्या फोटोचे आज्ञात समाजकंटकाकडून विटंबना झाल्याचे समजताच येथील वीरशैव बसव प्रेमी युवकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन तात्काळ बैठक बोलावून सदरील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून गावातील प्रतिष्ठाणे बंध करून उस्माननगर पोलीस स्टेशनला एक निवेदनाव्दारे जाहीर निषेध व्यक्त केला.
व तात्काळ दोषी आरोपीला त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करावी अन्यथा बसव अनुयायी समाज बांधवांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल ,समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. येथील बसस्टँड परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा बसविण्याच्या जागेवरील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची दि.७ मेच्या मध्येरात्री अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्यामुळे उस्माननगरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सपोनि डी.देवकते यांनी श्वानपथक पाचारण केले.
यावेळी नियोजित महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या जागेसमोर बैठक संपन्न झाली.त्यानंतर गावातील दुकाने बंद करून विटंबनाचा निषेधला समर्थन दर्शविले.यावेळी बसव अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिलेल्या निवेदनाला कंधार- लोह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात व सपोनि डी.देवकते यांनी दोषीला २४ तासात अटक करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. आज्ञात समाजकंटक विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी कोणतेही वाईट पाऊल न उचलता शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन त्यांनी केले.