नांदेड| शहरातील पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत दिनांक 30/04/2022 रोजी 10.45 वाजताचे सुमारास जव्हारनगर, तुप्पा, नांदेड येथे राहाणारा व्यक्ती सतीश चंद्रकांत कसबे, व्यवसाय वाहन चालक याने आरोपी सक्रीय गुन्हेगार दिलीप पुंडलीक डाकोरे रा. शंभरगांव ता. लोहा यास घरासमोरुन मोटार सायकल हळू चालविण्यास सांगीतले होते. मात्र त्या आरोपीने व त्याचा एक साथीदाराने अग्नीशस्त्राने हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करुन, फिर्यादी सतीश कसबे यास जिवे मारण्याचे उद्देशाने तलवारीने वार करून गंभीर जखमी करुन साथीदारासह मोटार सायकलवर बसुन पळुन गेला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गु.र.नं. 256/2022 कलम 307, 294, 323, 506, 34 भा.दं.वि. सह कलम 3/25, 4/25 भा.ह. का. प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा समांतर तपास स्था.गु.शा. कडुन सुरु होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक, निलेश मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, यांनी त्यांचे अधिपत्याखालील सपोनि पांडुरंग भारती व पोउपनि सचिन सोनवणे, अशिष बोराटे यांना आदेशित दहशत माजविणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार दिनांक 04/05/2022 रोजी गुन्हयातील फरार आरोपी दिलीप डाकोरे हा पोलीस ठाणे पालम हद्दीत असल्याची गोपनिय माहिती स्थागुशाला मिळाली. यावेळी तातडीने स्थागुशाचे एक पोलीस पथक पोउपनि सचिन सोनवणे व सोबत पोलीस पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी पालम भागात गेले होते. पोलीस पथकाने आरोपीचे मागावर राहुन, आरोपीस लोहा ते पालम जाणारे रोडवर पालम शिवारात पाठलाग करुन पकडले होते. पोउपनि सचिन सोनवणे यांनी सदर आरोपीस पकडल्याची माहिती स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे सपोनि पांडुरंग भारती व पोलीस पथक इतर आरोपीचे शोध कामी पोलीस ठाणे लोहा भागात होते.
त्यांनी पोउपनि सोनवणे यांची भेट घेऊन पकडलेल्या आरोपीस लोहा ते पालम रोडवर निसर्ग लंच होम या हॉटेलजवळ रोडलगत, आरोपीस गाडीचे खाली उतरावुन गुन्हयाबाबत विचारपुस करीत होते. त्यावेळी आरोपी दिलीप डाकोरे याने अचानकपणे पोउपनि सोनवणे यांचे कंबरेची पिस्टल हिसकावून घेऊन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पोउपनि सोनवणे यांना जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेने पिस्टल रोखला. पोलिसांनी असे ना करता आरोपीस शरण येण्यास सांगत होते, पण तो काही एक ऐकण्याचे स्थीतीत नव्हता. आणि वरून पुन्हा तो पोलीसांना जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेने पिस्टल रोखुन, सरकारी कामात अडथळा निर्माण करून, पळून जाण्याचे बेतात होता.
ताब्यात आलेला आरोपी पुन्हा पळून जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांचे जवळील सरकारी पिस्टलने एक गोळी आरोपी दिलीप डाकोरे यांचे डाव्या पायाचे फेंड्रीवर फायर केला. तेव्हा आरोपी दिलीप डाकोरे हा जखमी होऊन खाली पडला, पोलीसांनी आरोपीस पकडुन, पिस्टल काढुन घेतली. सदर आरोपी जखमी झाल्याने त्यास तात्काळ उपचार कामी ग्रामीण रुग्णालय, लोहा येथे नेऊन प्रथमोपचार करुन, पुढील उपचार कामी शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे शरीक केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. याघटनेची सविस्तर फिर्याद दिल्यावरुन पोलीस ठाणे लोहा येथे गु.र.नं. 99/2022 कलम 307,353 भा.दं.वि. सह कलम 3/25 भा.ह. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड निसार तांबोली आणि पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक, निलेश मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि सचिन सोनवणे, जमादार गुंडेराव करले, मारोती तेलंगे, संजय केंद्रे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, देवा चव्हाण, रवि बाबर, अर्जुन शिंदे, गंगाधर कदम, दशरथ जांबळीकर, शंकर मैसनवाड, बालाजी तेंलंग, दादाराव श्रीरामे, राजु पुल्लेवार, बजरंग बोडके यांनी पार पाडली आहे. सदर पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, यांनी कौतूक केले आहे.