किनवट,माधव सूर्यवंशी| राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या स्थापने पासुन पक्षाशी एकनिष्ठ असलेले व किनवट माहुर विधानसभा क्षेत्रावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा झेंडा ३ वेळा रोवुन अनेक कार्यकर्त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवुन न्याय देणारे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे राजकिय पुर्नवसन करा अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश राठोड व कचरु जोशी यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांना त्यांच्या नांदेड भेटी दरम्यान दिले आहे.
दिनांक १४ मे रोजी नांदेड येथे ज्येष्ठ नेते कमल किशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासह गोदावरी अर्बन बॅकेच्या मुख्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी नांदेड येथे खा. शरद पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बनसोडे हे आले असता कार्यकर्त्यां सोबतच्या नांदेड येथिल शासकीय विश्रामगृहात झालेल्या भेटीत किनवट राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड व ता. सचिव कचरु जोशी यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे कि, माजी आमदार प्रदीप नाईक हे सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहे तर सन २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील पक्षांतराच्या लाटेत देखिल ते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते तर त्यांनी कार्यकर्त्यांना देखिल एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिलेला आहे.
परंतु २०१९ च्या विधानसभा निवड्णुकीत थोडक्यात पराभव झाला तरी पक्षाचे कार्य एकसंघपणे मतदारसंघात चालु आहे. तरी आगामी निवडणूकीना सामोरे जाण्याकरिता व किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या सोडवण्याकरिता माजी आमदार प्रदीप नाईक हे सत्तेच्या मुख्य प्रवाहात असणे पक्ष हिताचे आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत त्यांचा समावेश करुन त्यांनी राजकिय पुर्णवसन करा. तरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या राजकिय पुर्णवसना संदर्भात निवेदनाकडे कसे पाहते याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.