संतोष मोरे वसरणीकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनसाठी निवड -NNL


नांदेड।
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या संस्थेच्या सन 2022-  2027 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार/ मतदार/सूचक/अनुमोदक यासाठी  डॉ. शंकररावजी चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढीच्या वतीने प्रतिनिधी म्हणून संचालक, संतोषराव मोरे वसरणीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 संतोष मोरे यांच्या निवडीबद्दल नुकताच त्यांचा सत्कार  राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते, तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव, डी. पी. सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष, प्रा. संतोष देवराये, उपाध्यक्ष  किशोरसिंह ठाकुर, सचिव  गंगाधरराव जाधव, खजिनदार  गजानन दरबस्तवार, संचालक  विलास देवसरकर,  डी .एस. काळे, सखाराम गजले, हिरामण साखरे, सौ मंजुषाताई कदम, सौ देशमुख , पतसंस्थेचे कर्मचारी प्रकाश कोरके, अनिल  व सर्व सन्माननीय संचालक उपस्थित होते. संतोष मोरे यांचे मित्र परिवाराने अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी