आम आदमी पार्टीमुळे हदगाव ची वीज समस्या सुरळीत होणार -NNL


हदगाव|
हदगाव येथील महावितरण चा विद्युत पुरवठा सतत खंडित होत होता. रात्री- बेरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड गर्मीत उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. वीज पुरवठा खंडीत झाला की नागरिकांना अनेकवेळा घराच्या बाहेर बसावे लागत असे. बाहेर बसल्यास मच्छर चावून नागरिक हैराण होत आहेत. विद्युत पुरवठ्याचे कमी- अधिक दाबाने येत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील कुलर, टीव्ही, फॅन असे विविध साहित्य जळून खाक झाल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या. या सर्व बाबीला वैतागून आम आदमी पार्टी हदगावच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

वीजेच्या लंपडावाने शहरातील छोटे मोठे व्यापारी, पोस्ट ऑफीस, बँका मधील कर्मचारी, ग्राहक पार वैतागून गेले आहेत. व्यापारी आस्थापनेवर असणारे कॉम्प्युटर, पंखे, सी सी टीव्ही कॅमेरे या सिस्टीम पूर्णतः खराब होत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. कॉम्प्युटर मधील डाटा नष्ट होत असून पुन्हा- पुन्हा डेटा तयार करावा लागता आहे. यामुळे आर्थिक व मानसिक, शारिरीक  त्रास सहन करावा लागत आहे. या होणार्‍या त्रासाचे विद्युत वितरण कंपनीला काहीही देणे घेणे राहिले नाही.

 म्हणून याकामी आम आदमी पार्टी हदगाव जि. नांदेड ने पुढाकार घेऊन संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष विचारपूस करून विनंती करण्यात आली व लवकरात लवकर नागरिकांना होणार्‍या त्रासापासून दिलासा देण्याची मागणी केली. तसे न केल्यास नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असा इशारा दिला. यावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासीत करुन लवकरच सुधारणा करू आणि वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेऊ असे महावितरणच्या अधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यामुळे नागरिकांतून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी आम आदमी हदगाव तालुका सयंजोक नागोराव गंगासागर, उपसयंजोक बापूराव कदम पाटील, तालुका सचिव प्रा. शिवाजी जोजार पाटील, विधिसल्लागार ऍड. के.आर. राऊत, कोषाध्यक्ष गिरीष गायकवाड पाटील, सहसचिव कैलाराव देशमुख, वॉर्ड क्रं. १६ चे अध्यक्ष रेशमाजी काळे, वॉर्ड १७ चे सचिन काळे पाटील, अनिल सावते, तसेच अनेक नागरिक, महिला उपस्थित होते. महावितरणला दिलेल्या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार हदगाव, जिल्हाधिकारी नांदेड, व महावितरण कार्यालय भोकर व नांदेडला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी