लकडोबा चौकातील श्री हनुमान मंदिर कलशारोहन निमित्त अखंड हरीनाम सप्ताह सुरू-NNL

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतले मारोतीरायचे दर्शन

हिमायतनगर।
लकडोबा चौकातील श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमाला शानदार सुरुवात झाली असून, हभप माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह सुरु झाला आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बालब्रम्हचारी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते व आ माधवराव पाटील जवळगावकर व लेकी बाळींच्या उपस्थितीत कलशारोहन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील महिला- पुरुष भाविकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर कमिटीने केलं आहे. दरम्यान काल 
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन मारोतीरायचे दर्शन घेतलं.


हिमायतनगर (वाढोणा) शहरातील दिवाणी न्यायालयाच्या बाजूस असलेल्या श्री लकडोबा देवस्थान मंदिर कमिटीच्या वतीने हनुमान मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन हभप माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.  सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान काकडा भजन, सकाळी ७ ते १० वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार असून, हभप.गंगाधर महाराज सांगोळकर हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ सांभाळणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ पर्यंत हरिपाठ, रात्रीला ८ ते ११ वेळेत हरिकीर्तन होत आहे. तर साप्ताच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अखंड विना पारायण सुरू आहे. शेवटच्या दिवशी दि.7 रोजी कलशाची भव्य मिरवणूक शहरांतील मुख्य रस्त्याने काढण्यात येऊन आ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत कलशारोहन होणार आहे.


हिमायतनगर येथे लकडोबा मंदिर कळसारोहन निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह सुरू आहे, काल दि.3 रोजी अक्षय तृतीया दिनी  माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन मारोतीरायचे दर्शन घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं,आणि सोसायटीच्या गाळे बांधकाम सोबतच मंदिराला लागून पाक शाळा बांधून देऊ असे आश्वासन दिलं आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी