उस्माननगर परिसरात ईद- उल-फित्र सण उत्साहात साजरा-NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
मुस्लिम धर्मात विशेष महत्व असलेल्या ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद हा पवित्र सण उस्माननगर परिसरात हिंदू, मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारुन व उस्माननगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डि.देवकते यांनी गुलाबाद्वारे शुभेच्छा देऊन ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

उस्माननगर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी मागील तीस दिवसांपासून रोजा (उपवास) धरला होता.यामध्ये सकाळी लवकर उठून नमाज अदा केल्यापासून ते सायंकाळी इप्तार पर्यंत रोजा ( उपवास) धरण्यात येतो.ईद म्हणजे आनंदाचा दिवस रमजान महिन्याचा हा शेवटचा गोड समारंभ,

देशासह जगभरात ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. ईद हा मुस्लिम धर्मांचा सर्वात मोठा सण मानला जातो.प्रत्येक  मुस्लिम बांधव  या खास दिवसाची वाट पाहत असतात.या दिवशी प्रत्येकजन आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जाते.

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिन्यातील ३० दिवसाच्या उपवासानंतर रोजा ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन येत आसतो.सर्व मशीद आणि ईदगा मैदानावर सामुहिक नमाज पठणा( अदा)साठी मुस्लिम बांधव एकत्र येतात.सामूहिक नमाजपठण केल्यानंतर एकमेकांना मिठी मारुन  शुभेच्छा दिल्या.कोरोणाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महिन्याभराच्या रमजानानंतर अखेर सोमवारी ईदचा चंद्र दिसला.चंद्र दिसताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारुन शुभेच्छा दिल्या.ईदच्या चंद्र दिसल्याने सोमवारी शेवटची नमाज ए-तरावीहची झाली.रमजानचा चंद्र दिसल्यानंतर मशिदीमध्ये सुरू झालेल्या तरावीहच्या विशेष नमाजाची सांगता झाली.

चंद्र दिसला की रमजान महिना संपला असे मानून दुसऱ्या दिवशी इतक्या च्या ठिकाणी किंवा मोठ्या मज्जित लोक एकत्र येऊन ईद-उल-फित्र ची सामूहिक नमाज पडतात प्रार्थना करतात गरीब श्रीमंत असा भेदभाव विसरून सर्व जण एकाच रांगेत उभे राहून रमजान महिना उत्तम तऱ्हेने गेल्या बद्दल अल्लाचे आभार मानतात.

उस्मान नगर ते कलंबर रस्त्यावरील उत्तरेकडील माळ टेकडीवरील इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. त्यानंतर उस्मान नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डि.देवकते व कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी उपसरपंच बाशीभाई शेख,मुखीद मौलाना ,जावेद मौलाना,आमिनशा फकीर,सलीम टेलर शेख,जाफर सय्यद, यांच्या सह जामामजिद चे मौलाना, मुस्लिम बांधव उपस्थित होते.गावात हिंदू मुस्लिम  बांधवांना एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी सभापती बालाजी पांडागळे,रामजी सोनसळे,लक्ष्मण कांबळे, राहुल सोनसळे, अशोक काळम, शिवशंकर काळे, कमलाकर शिंदे, गंगाधर भिसे,यांची लक्षणीय उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी