कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेकडून कालानुरूप संवर्ग हितास प्राधान्य -राज्याध्यक्ष नितीन धामणे -NNL


औरंगाबाद/देवगड/नेवासा।
महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने श्री क्षेत्र देवगड येथे संघटनेच्या संगणकिय आज्ञावलीचे (वेबसाईट) विमोचन मठाधिपती महंत हभप भास्करगिरी महाराज यांचे शुभहस्ते झाले. यावेळी राज्याध्यक्ष नितीन धामणे, राज्यसचिव हरिश्चंद्र काळे छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन सुदाम बनसोडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी

औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सन २०२२-२७ सहकार परिवर्तन पॅनलच्या निवडणूक वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.  याप्रसंगी अज्ञावली निर्मितीस विशेष सहकार्य करणारे  नाम फार्मर कंपनीचे रिजनल मॅनेजर अजय गवळी  यांनी कंपनीच्या माध्यमातून संघटना सभासद, गावपातळीवरील शेतकरी  हितासाठी समनव्यकाची भूमिका पार पाडतील. असे मत व्यक्त केले. या वेबसाईटमुळे संघटना सभासदांचे कामकाज अत्याधुनिक, गतिमान व परिणामकारक होऊन ग्रामीण विकासात महत्त्वाचे बदल घडविण्यास सहाय्यभूत ठरतील. 

त्यामुळे संघटना बळकटीकरण होऊन शिस्त, आर्थिक परिस्थिती सुधारून संवर्ग हिताचे प्रश्न सोडविण्याण्यासाठी काळानुरूप बदल स्वीकारल्यामुळे सुलभता लाभेल. असे मत राजाध्यक्ष नितीन धामणे यांनी व्यक्त केले. यावेळी औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक सोसायटी निवडणूकीमध्ये पदाधिकारी यांनी  संघटनानेची शिस्त मोडून उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवल्यामुळे केलेल्या कारवाईचे समर्थन केले. नवनवीन  संकल्पनेतुन आपल्या संघटनेची वर्तमान गतिमानता, परिणामकता व भविष्यकाळाचा वेध घेण्यासाठी नवीन वेबसाईट निर्माण केल्याबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले. तसेच उभे असलेल्या उमेदवारांना उचांकी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

औरंगाबाद ग्रामसेवक सोसायटी निवडणूक उमेदवार विलास डेंगे, प्रदीप कुवर, वसंत इंगळे, केशव सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यभान सौदागर, शरद गायकवाड, रणजित मेनगर, किसन काळे, गणेश विखे, दिनेश राठोड , विजय वांडेकर, पाचडे, उत्तम भोंडवे, श्री ढोले, श्रीकांत पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी