हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात वादळी वारे, विजांच्या गडगडाटात अर्धा तास पाऊस -NNL


हिमायतनगर , अनिल मादसवार।
शहर व तालुका परिसरात विजांच्या कडकडाटात दि. 12 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या गडगडाट होऊन अर्धा तास जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे गेल्या अनेक महिण्यापासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी शेती कामात व्यत्यय निर्माण झाला आहे,.


खरीप हंगाम जवळ येऊन ठेपल्याने शेतकरी मशागतीच्या अंतिम टप्प्यातील कामात व्यस्त आहे, त्यात वैरण, इंधन जमा करणे, शेतीची केर कचरा काडून रान निर्मळ करण्यासाठी सज्ज असून, अश्याच वेळी आज रात्री विजांच्या गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. आज रात्रीला झालेल्या वादळी वाऱ्याने शेतीत जमा केलेलं इंधन, वैरण अस्तव्यस्त झाले आहे.

 वादळी वारे विजांच्या कडकडाट रात्री 11 पर्यंत सुरूच असल्याने शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांतील वीज गुल झाल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. यामुळे अनेकांना रात्र अंधारात व डासांच्या सानिध्यात काढावी लागली, तर झालेल्या पावसामुळे बिळात लपलेले विंचू, किडे, साप, इत्यादि सरपटणारे प्राणी बाहेर आल्याने अनेक नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी