रास्तारोको ,टायराची जाळपोळ, तनावाचे वातावरण पोलीस प्रशासनाला आवाहन
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील बसस्टँड परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील बसवेश्वरांच्या प्रतीमेची समाजकंटकाने दि. १६ मे सोमवारच्या मध्येरात्री विटंबना केल्याचे समजताच गावातील वातावरण पुन्हा तनाव पुर्ण झाले. नागरिकांनी गावातील बाजारपेठ बंद करून राष्ट्रीय महामार्ग एन.एच. पन्नासवर(५०) रास्ता रोको करून घटनेचा निषेध व्यक्त केला. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या ठीकाणी आठ दिवसांत दोनवेळा महात्मा बसवेश्वरांच्या प्रतीमेची विटंबना झाली त्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेला मोठे आव्हाण ठरले आहे.
उस्माननगर येथे यापूर्वी आठ तारखेला आशीच घटना घडली होती.पोलिस प्रशासनाने २४ तासांत आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते.पण आरोपी काही सापडला नाही.पुन्हा अज्ञात समाजकंटक व्यक्तीने बसस्टँड वरील नियोजित पुतळ्याच्या जागेवरील महात्मा बसवेश्वर यांच्या फलकावरील बॅनरच्या प्रतीमेची विटंबना करुन पोलिस प्रशासनाला आवाहन केले आहे.यामुळे बसवप्रेमी एकत्र येऊन घटनेचा निषेध केला.
पोलीसांच्या विरोधात आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी करुण उस्माननगर पोलिसांच्या तपासावर आमचा भरोसा नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना सांगितले. पोलीस फोजफाट्यसह अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार मुंढे,कंधार विभागाचे थोरात, पो.नि. चिखलीकर,ग्रामीण चे पो.नि.अशोक घोरबांड, घटनास्थळी दाखल झाले आरोपीला लवकरच पकडण्यात येईल सर्वांनी शांतता राखावी कायदा कोणीही हातात घेउनये प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती मोरे यांनी केली.
यावेळी समाज कंटकाचा ताबडतोब बंदिस्त करूण अशा घटना वारंवार घडु नयेत अशी विनंती बसव ब्रीगेडचे अविनाश भोसीकर, वंचीतचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले , शिरढोणचे सरपंच खुशाल पांडागळे, बालाजी ईसादकर, संजय वारकड, गोविंद पोटजळे, शिवसागर मठपती आदींनी प्रशासनाला केली आहे. यावेळी कंधार लोहा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.पोलिस प्रशासनाच्या वतीने बसवप्रेमीना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.