शिवणीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा -NNL

त्यागाचे आणि बलिदानाचे प्रतीक श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी आर्य वैश्य समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळख     


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
किनवट तालुक्यातील शिवणी सह इस्लापुर, बोधडी,किनवट शहरात दि.११ मे २०२२  बुधवार रोजी सायंकाळी आर्य वैश्य समाजाच्या वतीने त्यागाचे आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या आर्य वैश्य समाजाचे आराध्य दैवत श्री वासवी माता कन्यका परमेश्वरीचे प्रगट दिनानिमित किनवट शहर सह तालुक्यातील शिवणी, बोधडी,इस्लापुर,सह अनेक ठिकाणी श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आले.या वेळी आर्यवैश्य समाज बांधवांच्या वतीने वासवी मातेच्या प्रतिमेस अभिवादन करून महाआरती करण्यात आले. या वेळी सहशिक्षक शिवकुमार बच्चेवार सह अनेकांनी माता वासवी कन्यका परमेश्वरी बद्दल इतिहास कालीन विविध माहिती सांगितले.                                                   

मराठी तिथी प्रमाणे वैशाख शुद्ध दशमी हा दिवस समस्त आर्य वैश्य समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा मनाला जातो.कारण वैशाख शुद्ध दशमी हा दिवस वासवी मातेचा जन्मोत्सव सोहळा म्हणून भारतातील समस्त आर्य वैश्य समाजाच्या वतीने संपूर्ण भारतात व विदेशात असलेले समाज बांधव विविध सामाजिक उपक्रम राबवत श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी प्रगट दिन म्हणून साजरा करतात.                  

इ.स.पूर्व पंधराशे वर्षांपूर्वी आजच्या आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात थानकुसा तालुक्यामध्ये 'पेनुगोंडा' नावाचे एक गाव आहे. या गावांमध्ये वासविचा जन्म झाला.म्हणून हे श्री वासवी कन्याका परमेश्वरीचे जन्म स्थान म्हणून ओळखले जाते.इतिहातील विविध शास्त्रात माता वासवी कन्याका परमेश्वरी संबंधी राजा कुसुमश्रेष्टी व राणी कुसुमांम्बा आणि गुरू भास्कराचार्य बद्दल विविध शास्त्रात कथा व दृष्टांत वाचण्यास व ऐकण्यास मिळते.आज स्थिती 'पेनुगुंडा' हे शहर येथे श्री वासवी माता कन्याका परमेश्वरीचे १०२ खांबावर भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले असून येथील प्रत्येक खांब हा अग्निकुंडात आहुती देणाऱ्या १०२ गोत्रज कुटुंबासाठी असून प्रत्येक खांबावर गोत्र कुळाची माहिती दिली आहे.

मंदिराच्या बाजूला १०२ फुटाची आकर्षक पंचधातूंची भव्य दिव्य मूर्ती स्थापना केली आहे. करीता 'पेनुगुंडा' या शहराला आर्य वैश्य समाजाचे मूळ पीठ म्हंटले जाते.तर दुसरीकडे या  तीर्थाला भारतातील आर्य वैश्य  समाजाचे काशी पीठ म्हणून ही संबोधले जाते. म्हणूनच मराठी तिथी प्रमाणे वैशाख शुद्ध दशमीला आर्य वैश्य समाजाच्या वतीने श्री वासवी कन्यका परमेश्वरी माताचे जन्मोत्सव सोहळा मोठया सर्वत्र उत्साहात साजरा करत असतात.

या अनुषंगाने किनवट शहरासह तालुक्यातील शिवणी,बोधडी, ईस्लापुर, सह अनेक ठिकाणी श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरी करण्यात आले.या वेळी शिवणी येथील आर्य वैश्य समाजाचे बच्चेवार परिवारासह, कन्नावार,चिद्रावार, कोटगीरे,डोंगसरवार,मामीडवार पलिकोंडावार, तुप्तेवार,कोटलवार, निलावार उपलेंचवार, चौधरी, कवटीकवार व समाजातील सर्व परिवारातील महिला मुली सर्व लहान थोर मंडळींनी मोठया उत्साहात भाग घेत विशिष्ट पोशाख परिधान करून श्री वासवीमाता कन्यका परमेश्वरीचे जन्म सोहळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी