हिमायतनगर, अनिल मादसवार| कोरोनमुक्तीचा उपाय.. योग हाच पर्याय हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आठ दिवसीय मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरुवात साईभक्त गुरुस्वामी पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन आणि हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शनिवार दि. २१ में रोजी सकाळी ५ वाजता झाली. धकाधकीच्या जीवनात मनुष्य व्याधिग्रस्त झाला आहे. त्या व्याधींपासून योगाच्या माध्यमातून मुक्ती मिळावी, निरामय आयुष्यासाठी सर्वानी योग करावे असे आवाहन जिल्हा प्रभारी सुरेश लांगडापुरे यांनी केले.
गेल्या महिन्याभरापासून हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे तयारी येथील पतंजली योग्य समितीचे प्रशिक्षक, स्वयंसेवक व परमेश्वर मंदिर ट्रस्ट आणि हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी जय्यत तयारी केली होती. या शिबिरात आपले जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त, नशामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला -पुरुष व बाळगोपाळांना सहभाग घेतला. मन व सुदृढ शरीरासाठी मानसिक ताणतणाव मुक्तीसाठी योग प्राणायामाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वानी योग करणे आवश्यक आहे, असे सांगत योगगुरू सुरेश लांगडापुरे यांनी विविध आसने आणी त्याचे फायदे सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच ह्या योग विज्ञान शिबिरात ८ प्रकारचे प्राणायाम, ५२ प्रकारची सुखसम व साधारण आसने, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, तरुण तरुणींसाठी दंड आसन/ बैठक, कठीण आन हे निशुल्क/मोफत शिकविल्या जाणार आहेत.
हिमायतनगर येथील हुजपा. महाविद्यालय परिसरात सकाळी ५ वाजता योग शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी योग समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिबिराला साईभक्त गुरुस्वामी पवार, अशोक पवार, सुरेश लानगडापुरे, अक्कलवाड सर, मुलचंद पिंचा, शीतल दीदी, सुनंदा दासेवार, ऋघे बाई, देशपांडे ताई, चवरे बाई, कंठाळे सर, अविनाश संगणवार, बाळू चावरे, उदय देशपांडे, वऱ्हाडे सर, बाळू अण्णा चवरे, रामराव सूर्यवंशी, गजानन चायल, पळशीकर, साहेबराव अष्टकर, विठ्ठलराव देशमवाड, मारोती लुम्दे, संतोष गाजेवार, परमेश्वर इंगळे, बलपेलवाड बंधू यांच्यासह महिला मंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली.
शिबिराच्या पहिल्या दिवशीय वर्ग समारोप प्रसंगी हुजपा महाविद्यालयाच्या वतीने योगगुरू मार्गदर्शक म्हणून आलेले गुरुस्वामी साहेबराव पवार किनवट, पतंजली योग समिती हिमायतनगरचे प्रभूजी पळशीकर, पतंजली योग समिती नांदेड जिल्हा प्रभारी सुरेश लंगडापुरे, पतंजली योग समिती नांदेड जिल्हा सहप्रभारी अशोक जी पवार, ओमशांती केंद्राच्या दीदी यांचे प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्यातर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला. या योग ध्यान व चिकित्सा शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांना 1) प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम, 2) डॉ. दिलिप माने (क्रिडा संचालक), 3) डॉ. शिवाजी भदरगे, (कार्यक्रमाधिकारी- रासेयो), 4) प्रा. एम. पी. गुंडाळे, (इंग्रजी विभाग), 5) डॉ. एल.एस. पवार (मराठी विभाग), 6) डॉ. कृष्णानंद पाटील (पर्यावरण विभाग), 7) श्री संदीप हारसूलर (कार्यालयीन अधिक्षक), 8) प्रा. राजू बोंबले (ग्रंथपाल) यांच्यातर्फे काढा देण्यात येणार आहे.