सुखप्रीतकौरच्या अस्थींचे नांदेडच्या गोदवारीत विसर्जन -NNL


नांदेड।
समस्त महाराष्ट्राला हदरून टाकणाऱ्या औरंगाबाद येथे घडलेल्या एका विक्षिप्त घटनेतील बळी ठरलेल्या कुमारी सुखप्रीतकौर (कशिश) पिता प्रीतपालसिंघ ग्रंथी हिच्या अस्थींचे विसर्जन सोमवारी सायंकाळी 5 वाजता गोदावरी नदीत करण्यात आले. 

गुरुद्वारा तखत सचखंडचे हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, शीख समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि नतेवाईकांच्या उपस्थितित शीख धार्मिक परंपरेनुसार अस्थींचे विसर्जन पार पडले. तत्पूर्वी गुरुद्वारा येथून अरदास करून यात्रेच्या रुपात अस्थि कलश गोदावरीच्या नगीनाघाट येथे नेण्यात आले. नगीनाघाट येथे दिवंगत मुलीचे वडील स. प्रीतपालसिंघजी ग्रंथी आणि त्यांच्या कुटुम्बियानी शोकाकुल वातावरणात अस्थींचे विसर्जन केले. त्यावेळी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. 


विशेष म्हणजे दिवंगत मुलीचे आजोळ नांदेडचे होय. गुरुद्वाराचे माजी जत्थेदार सचखंडवासी स्व. संतबाबा हजूरासिंघजी यांचे भाऊ स. बलबीरसिंघ धूपिया हे मुलीचे सक्खे आजोबा होय. तर स. जसबीरसिंघ धूपिया, राजूसिंघ धूपिया यांची ती भाची होती. सुखप्रीतकौर (कशिश) मनमिळाऊ स्वभावाची होती व नांदेडला नेहमीच यायची. पण दोन दिवसांपूर्वी ती एका विक्षिप्त मानसिकतेची बळी ठरली. एका युवकाने एकतर्फा प्रेमातून तिच्यावर तीक्ष्ण हथियाराने हल्ला करून तिचे प्राण घेतले. 


निर्दयतेचे कळस गाठणाऱ्या त्या घटनेचे उल्लेख करत दिवंगत सुखप्रीतकौरच्या (कशिश) वडिलांनी मागणी केली की देशातील मुलींवर असले हल्ले करणाऱ्या विरुद्ध कडक कायदा अमलात आणला गेला पाहिजे. तर उपस्थित नातेवाईकांनी सुखप्रीतकौरच्या मारेकरीला त्वरित सजा मिळायला हवी असा आग्रह कायम ठेवत, असले प्रकार समाजात पुन्हा घडू नयेत याचा विचार करून मारेकऱ्याला फाशी सारखी सजा ठोठाविण्यात यावी अशी मागणी केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी