हिमायतनगर। येथिल दै. सकाळचे बातमीदार प्रकाश जैन यांना कै दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान कंधार, यांच्या कडून कै. सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला त्या निमित्त खासदार हेमंत पाटिल यांनी शुभेच्छा संदेश पाठवुन जैन यांच्या कार्याची प्रशंसा केली.
दै.सकाळचे तालुका बातमीदार प्रकाशजी जैन वास्त व शोध पत्रकारीता करून समाजातील चांगुलपणा बरोबर उणीवा मांडुन व्यवस्थेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सातत्यपुर्ण लिखाणाची दख्खल घेत नुकताच कै दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान कंधार, यांच्या कडून कै. सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
यानिमित्त हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटिल यांनी शुभेच्छा पत्र पाठवुन त्यांचा कार्य गौरव केला. तसे पत्र दि. २ सोमवारी तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे व जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांनी पुष्पहार घालुन दिले.
यावेळी परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, पत्रकार दत्ता शिराणे, सोपान बोंपिलवार, मनोज पाटिल, ज्ञानेश्वर पंदलवाड, दिलीप शिंदे, अनिल नाईक, सुनिल दमकोंडवार यांचेसह अनेकजन उपस्थित होते.