ब्राह्मण समाजाचा एकच वर्ष कार्यक्रम न घेता सातत्याने समाजात सक्रिय काम करणारे कार्यकर्ते महत्त्वाचे-खा प्रतापराव पा चिखलीकर-NNL


नांदेड।
ब्राह्यण समाजाचे आद्य दैवत तथा विष्णूचा अवतार भगवान परशुराम जन्मउत्सवाच्या निमित्ताने नांदेड येथील भगवान परशुराम चौक येते आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी आपल्या शैलीत शहरात एकच वर्ष ब्राह्यण समाजाचे कार्यक्रम घेणारी काही मंडळी आहे. पण निखिल लातुरकर हे ब्राह्मण समजाचे नेतृत्व गेल्या दोन दशकापासुन हे कार्य करत आहेत आसे कार्यकर्ते समाजासाठी महत्त्वाचे आसतात आसे मत व्यक्त केले.

नांदेड शहरात भगवान परशुराम मंदिर हे येणाऱ्या परशुराम जयंती पर्यत पुर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे सुद्धा यासाठी महत्वपुर्ण योगदान देतील व राजकारण हे फक्त निवडणूकी पुरतेच राहिले पाहिजे. शहरातील काही मंडळी कुठल्याही कार्यक्रमात राजकारण करत आहेत हे योग्य नाही.निधी आसो किवा विकास कामाचा आलेख किवा विविध धार्मिक कार्यक्रमात तर राजकारण नसावे आसे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला व उपस्थित ब्राह्मण समाजाच्या सर्व पदधिकारी व कार्यकर्ताना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सिनेस्टार शरदराव पोंक्षे याची उपस्थिती होती भारत आज काल व उद्या या विषयावर तब्बल 1 तास प्रबोधन करण्यात आले शरदराव पोंक्षे यानी हिंदुस्थानातील झालेल्या आक्रमन.इंग्रज लोकांच्या येथील झालेल्या विविध घटना.व छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले "स्वराज्य" आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सिने अभिनेता शरदराव पोंक्षे,आमदार बालाजीराव कल्याणकर, भाजपा महानगरध्यक्ष प्रविणभाऊ साले,  मिंलीद देशमुख. बाळु खोमणे डाँ.बालाजीराव गिरगावकर, अनिलसिंह हाजारी, मनोज जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख जयवंतराव कदम, मनपा सभापती सौ.अपर्णाताई नेरलकर.व विश्वासशास्त्री घोटजकर, रोहीत पाटील आंडगेकर याची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिलभाऊ लातुरकर,जिल्हाध्यक्ष विजय जोशी,बाळासाहेब पांडे माजरमंकर, संतोष परळकर, अनिल डोईफोडे, सुनिल रामदासी, संतोष कुलकर्णी.सौ,प्रितीताई वडवळकर, सौ.मनिषा कुनसावळीकर.सौ.अपर्णा मोकाटे. प्रज्योत कुलकर्णी, सुनिल देशाई.राजेश सुजलेगांवकर,रोहण कुलकर्णी, कृष्णा बेरळीकर, भाग्यश्री कुलकर्णी अर्चना शर्मा. प्रणिता कुलकर्णी, जयश्री बंगाळे. सुवणाताई भोरे. विभा जोशी.  आदी  ब्रम्हवृंद मोठ्या संखेने  उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी