किनवट। जगतज्योती महात्मा बस्वेश्वर महाराज यांची ९१७ वी जयंती शहरातील बस्वेश्वर चौकात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. किनवट शहरातील महात्मा बस्वेश्वर चौकात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात जगतज्योती महात्मा बस्वेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यासमयी भाजपचे जेष्ठनेते शिवराज राघु मामा व विश्वनाथअप्पा भंडारे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचे हस्ते महात्मा बस्वेश्वराच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यावेळी म. बस्वेश्वराच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकतांना राघु मामा यांनी आपले मत मांडले आणि नगराध्यक्षा समक्ष शहरात महात्मा बस्वेश्वरांच्या पुतळ्यासाठी मागणी केली. त्यावेळी नगराध्यक्ष मा. आनंद मच्छेवार यांनी नगरपरिषदेत ठराव घेऊन आपली मागणी मांडण्यात येईल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावा, राघु मामा, विश्वनाथ भंडारे, नागनाथ भंडारे, गणपत भंडारे, बाळू व्यवहारे, अरुण भंडारे, सतिष बिराजदार, चंद्रकांत भंडारे, अनिल भंडारे, पत्रकार आनंद भालेराव, कुष्णा कलकुंटवार, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, संदिप नखाते, सामनगावेअप्पा, वड्डेअप्पा, महेश बिराजदार, डॉ. सुर्वे, संतोष ठोंबरे, महेश भंडारे, विजय महाजन, विनायक ठोंबरे, गजू शिवनकर इत्यादींची उपस्थिती होती.