हिमायतनगर तालुक्यातील विरसनी हद्दीतील पैनगंगा नदीतून अवैध्य रित्या होतेय रेतीची चोरी -NNL

विदर्भाचे पथक आल्याचे समजताच ५ ते ७ ट्रैक्टर रेती माफियांनी काढला पळ


हिमायतनगर, अनिल मादसवार|
दिघी, हिमायतनगर भागातील काही रेती तस्करांनाही पैनगंगा नदीतील लिलाव न झालेल्या विरसनी बंधाऱ्यापासून रेतीचोरीचा गोरखधंदा या भागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या संगनमताने सुरु केला आहे. असे असताना देखील हिमायतनगर भागातील अधिकारी स्वार्थापोटी कार्यवाही करण्यास तयार नसले तरी विदर्भातील महसूल पथक आल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील ५ ते ७ ट्रैक्टर रेती माफियांनी पळ काढला आहे. अशी माहिती विदर्भातील एका अधिकाऱ्याने नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली असून, यावरून हिमायतनगर महसूल अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. 

गेल्या अनेक वर्षपासून विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरून चोरीच्या मार्गाने राजकीय वरदहस्त असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील विविध गावच्या ट्रैक्टर वाहनधारकांनी रेतीचोरीचा गोरखधंदा चालविला होता. याबाबत वर्तमानपत्रातून आवाज उठविल्यानंतर यंदा महसूल विभागाने रेती लिलावाचा अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या पुढाकाराने ५ रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले आहेत. तर अनेक रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या घाटावरून राजकिय वरदहस्त असलेल्या लाही वाळू दादांनी आपला रेती चोरीचा गुरखधंदा सुरु केला आहे. या प्रकारची माहिती संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यास असताना देखील केवळ खाबुगिरीची सवय जडल्यामुळे स्वार्थापोटी शासनाच्या महसुलावर दलाल मरणार्यांना अभय देत आहेत.

तर ज्या ठिकाणी लिलाव झाले ते ठिकाण सोडून अन्य ठीकाणाहून रेतीचा उपास करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरु केला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विदर्भातील महसूल पथकाने हिमायतनगर हद्दीतील लिलाव न झालेल्या ठिकाणावर छापे मारून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मात्र हिमायतनगर तालुक्यातील महसुलाचे पथक कुंभकर्णी झोप घेऊन आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप हिमायतनगर तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी करून हिमायतनगर महसूल विभागाची पोलखोल केली आहे. नुकतीच काही दिवसापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील एका वाहनावर कार्यवाही केल्याची माहिती उमरखेड महसूल प्रशासनाने दिली आहे. 

आज दि.१३ मी रोजी देखील दिघीसह काही रेती माफियांनी विल्सन येथील बंधाऱ्याच्या जवळून रेती उपास सुरु केला, याबाबतची माहिती मिळल्यानंतर उमरखेड विभागाचे तलाठी थोरवे यांनी सकाळी ८.३० वाजता आपल्या पथकांसह या भागात रेती तस्करी होत असल्याचे समजल्यानंतर छापा टाकण्यासाठी नदीत दाखल झाले. मात्र हिमायतनगर तालुक्यातील ५ ते ७ ट्रैक्टर वाहन घेऊन फरार झाले असल्याने कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र यापुढे असे प्रकार आढळून असल्यास त्या रेती माफियांच्या मुसक्या आवळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. तर तुमच्या हिमायतनगर भागातील महसुलाचे लोक या रेतीचोरावर कार्यवाहाची का..? करत नाहीत असा सवालही पथकातील काहींनी उपस्थित केला आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी