नांदेड। नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीसाठी आता 18 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीचे पत्र केंद्र सरकारने जारी केले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल , केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला.
नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी करण्यात येत होती. शासनाच्या ठराविक नियमाप्रमाणे 29 मे 2022 पर्यंत खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतु अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे दिनांक 23 मे पासून हरभरा खरेदी बंद होती. त्यामुळे नांदेडसह महाराष्ट्रातील असंख्य जिल्ह्यामध्ये लाखो क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून होता. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता अनेक शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी यांनी खासदार प्रतापराव चिखलीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन देत नफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी या अनुषंगाने मागणी केली होती.
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नाफेड अंतर्गत होणारे हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी दिनांक 27 मे रोजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नाफेड संघाकडून करण्यात येणाऱ्या हरभरा खरेदीला 18 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा आणि हरभरा उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा हा निर्णय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागला आहे.
दरम्यान नांदेड जिल्ह्यातील नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र गोदामाई फार्म शेळगाव, राजे मल्हार होळकर नारनाळी , धरणी शेतकरी उत्पादक कंपनी जोमेगाव , एस अँड पी पाटील फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड देगाव, कॉन्टेस्ट कासराळी, रूपाली शिव फार्मर डोणगाव बुद्रुक, बाबळी बंधारा बाबळी, बरबडा परिसर ऍग्रो कंपनी बरबडा ,शिवलिंग बादशहा फार्मर प्रोड्यूसर कंपनी डोणगाव खुर्द, नवी दिशा फार्मर प्रोड्यूसर कंपनी धुप्पा शंकरनगर , बेबी ऍग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी, चंद्रगुप्त मौर्य कोल्हे बोरगाव, किसान स्वराज नरसी, काळे मंगेश फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड बामणी, देगलूर फार्मर कारेगाव, केनकी संगमेश्वर प्रायव्हेट लिमिटेड खानापूर ,
कै. शामराव पाटील बारसे ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, नंदिग्राम नांदेड कंपनी, गणराज देशमुख फार्मर कंपनी नवामोंढा नांदेड , एफ पी सी लोहा , आर.बी. चव्हाण तामसा यांच्यासह अनेक फार्मर प्रोड्यूसर कंपनीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन नाफेड अंतर्गत खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने निवेदन देऊन विनंती केली होती. याकामी मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक सुधाकरराव तेलंग नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी सहकार्य केले यावरून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी पाठपुरावा केला.