हिमायतनगर| येथील दासरी - माला दासरी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमंना यंगलवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना शिवरत्न पूरसाकरने गौरविण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाज बांधवांसह सर्व स्तरातील नागरीकातून अभिनंदन केले जात आहे.
वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड, महाराष्ट्र राज्य यांच्या वाटणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वांचा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो. यंदा या संस्थेच्या वतीने हिमायतनगर येथील रहिवाशी असलेले दासरी - माला दासरी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमंना यंगलवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय शिवरत्न पुरस्कार दि.३१ मार्च २०२२ रोजी एड दिलीप ठाकूर, पंढरीनाथ बोकारे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.
त्यांना देण्यात आलेल्या पुरस्कारात सन्मानपत्र, शाल - श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पहार असे स्वरूप होते. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे समजल्यानंतर सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि त्यांना मानणाऱ्या व्यक्तीने मुरहारी यंगलवार यांना सोषसील मीडिया, दूरध्वनी आणि विविध प्रकारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.