नायगाव, दिगंबर मुदखेडे| नायगाव तालुक्यातील विविध ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम घेऊन मोठ्या उशार जयंती साजरी करण्यात आली.
दिनांक 14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महाराष्ट्राला जागी ठेवण्याचं कार्य आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून झालेल आहे. त्यांच्या कारकर्दीला उजाळा देण्यासाठी प्रत्येक गावी शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती साजरी केली जाते. त्याच प्रमाणे दि.14 एप्रिल 2022 ग्रामपंचायत कार्यालय सुजलेगगाव येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापुढे आदर्श करून दाखविण्यासाठी आहेत. हे विचार आचरणात आणून समाजाला एक नव्या प्रकारची वळण मिळाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केल. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला. ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.
सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ज्या प्रमाने भीमाबाई आपल्या मुलांना संस्कार देउन भीमराव रामजी आंबेडकर यांना घडवीले त्याचं प्रमाणे प्रत्येक नागरिकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजले पाहीजेत. त्यांचा आदर्श घेऊन मुलाना घडविले पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दैवाशाला डुमणे व नागोराव डुमणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.त्याप्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी भगवानराव देशमुख उपसरपंच लक्ष्मण पाटील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पांचाळ ,लक्ष्मीबाई बोरवाड, दैवशाला नागोराव डुमणे ,रेणुका पांडुरंग वडजे, प्रतिभा शेळके, विमलबाई कंदकुर्ते ,लक्ष्मण सुर्येकर, बळीराम जाधव , माजी सरपंच शहीद दिगंबर तूमवाड, नारायण काळे वर, नागोराव डुमणे, प्रकाश झगडे, संजय सूर्यकार, माजी सरपंच गंगाधर देवाले, ग्रामपंचायत पाणी वाटप सेवक शिवाजी जाधव , पोलिस पाटिल निलकंठ पाटिल,तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर जाधव , मारुती कदम ,मोहन आईलवार, पत्रकार दिगंबर मुदखेडे आदींची उपस्थिती होती तरं अध्यक्षस्थानी शाहीर दिगू तुंबाड यांच्या हस्ते बुद्ध विहार येथे ध्वजारोहण संपन्न झाला तर प्रमुख म्हणून भगवानराव देशमुख हे होते.
जयंती निमित्त शाहीर दिगू तुंबाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर थोडक्यात विचार मांडले तर त्यांनी जयंती साजरी करावी तर नाचून साजरी न करता संविधान वाचन साजरी करावी अशी त्यांनी समाजाला चांगला संदेश दिला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडायचे असतील तर राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञाना संबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. ते विचार समाजातील लोकांनी आत्मसात करून समाजाचे पुढे निर्माण करावा असे ते म्हणत होते. यावेळी गावातील महिला व गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती,त्याचबरोबर अजय नागोराव डुमणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.