लोहा| जाती धर्माच्या पल्याड जाऊन महामानवांच्या विचारांचे आत्मसात करावे हा विचार आदिवासी कोळवाडी गावात रुजविण्याचे कार्य गेल्या काही दशका पासून "आदिम "या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड करीत आहेत.जेथे एकही आंबेडकरी जनतेला नाही त्या कोळवाडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदाही मोठया उत्साहात साजरी झाली.
आदिवासी बहुल असलेल्या कोळवाडी गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच प्रकाश मेकेवाड हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते..आदिम विकास परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड हे राज्यात आपल्या जमातीच्या प्रश्नासाठी सामाजिक चळवळीत सक्रिय असतात त्यांच्याच पुढाकाराने डॉ बाबासाहेब यांचे विचार वाडी-पाड्यावर पोहचत आहेत.
त्यांनी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी कोळवाडी तील नारायण मेकेवाड मुकदम, सूर्यकांत मेकेवाड, बाबुराव मेकेवाड, सुदाम मेकेवाड, भास्कर मेकेवाड, प्रभू मेकेवाड, गोविंद पिठ्ठलवाड, अमृत मेकेवाड, थोराजी मेकेवाड, राजुभाऊ मेकेवाड, सखाराम मेकेवाड, वनदेव मेकेवाड, यांची उपस्थिती होती. जयंती सोहळ्यासाठी आदिम विकास परिषदेचे विश्वनाथ मेकेवाड, अर्जून मेकेवाड, दत्ता मेकेवाड, अमोल यंबलवाड, लक्ष्मण पिठ्ठलवाड, संदीपान मेकेवाड, प्रदिप मेकेवाड, अमोल लोंढे यांनी परिश्रम घेतले...