हनुमान जन्मोत्सवा निमित्त शनिवारी बोरगडी येथील मारुतीरायाच्या मंदिरात उसळणार भक्तांची मांदियाळी -NNL

रविवारी कुस्त्यांच्या दंगली व महाप्रसादाने होईल यात्रा उत्सवाचा समारोप 


हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारुतीरायाच्या मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य श्रीराम कथा, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दि.१० रविवार पासून झाली आहे. मारोतीरायाचा जन्मोत्सव सोहळा दि.१६ एप्रिल शनिवारी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५.३० वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत हभप गणेश महाराज कोल्हारीकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. सप्ताहाचा समारोप दि.१७ एप्रिल रविवारी कुस्त्यांची दंगल व महाप्रसादाने होणार आहे. उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी उपस्थित राहून हनुमंतरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटी आणि गावकर्यांनी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील मारोतीरायाचे मंदिर मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी बोरगडी येथे जन्मोत्सव निमित्ताने हजारो भाविक भक्त उपस्थित होऊन आपली मनोकामना पूर्ण करतात. ज्यांची इच्छा पूर्ण झाली ते भाविक पुरण  पोळीचे नैवैद्य हनुमंतरायला चढवितात. कोरोनामुळे गत दोन वर्षपासून भक्ताना हनुमंतरायाचे दर्शन घेता आले नाही. यंदा कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्याने यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगडी येथील मारोतीरायाच्या मंदिरात हरिनाम सप्ताह कार्यक्रम हभप. माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. या निमित्त होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यात साईनाथ गुजेवाड रा.नंदा ता.भोकर यांच्यातर्फे १२५५१ रुपये, सौ.दुर्वा उर्फ कौशल्य गजानन वानखेडे रा.वटफळी यांच्यातर्फे १११११ आणि राजू नरेंद्र चव्हाण बोरगडी तांडा ना.१ यांच्यातर्फे १००१ रुपये अन्नदानासाठी देण्यात आले आहेत. 

रामनवमी दि.१० पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांच्या मधुर वाणीत संपन्न होती आहे. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत हभप. पांडुरंग महाराज येळेगावकर, हभप. निळोबा महाराज हरबळकर, हभप.सुदाम महाराज पिंपळदरीकर, हभप. सुनील महाराज लाजूळकर, हभप डॉ.लक्ष्मीकांत रावते ढाणकीकर, यांचे हरिकीर्तन झाले असून, रात्री हभप.गणेश महाराज राठोड यांचे कीर्तन होणार आहे. उद्या दि.१६ एप्रिल म्हणजे शनिवार रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा असल्याने पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५.३० वाजता अभिषेक महापूजा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत हभप गणेश महाराज कोल्हारीकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत हभप.अनंत महाराज बेटकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. 

दि.१७ हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या समारोप दिनी हभप.भगवतीताई महाराज सातारकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसाद होणार आहे. दुपारी १२ ते ०२ वाजेच्या दरम्यान कठाळ्याची हर्राशी त्यानंतर दुपारी १ वाजता कुस्त्यांची दंगल सुरु होणार आहे. याचे उद्घाटन व बक्षीस वितरण श्रीरंग काईतवाड व प्रेमराव राठोड पोलीस पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. यात जिंकणाऱ्या मल्लास ४००१ रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, दुसर्या क्रमांकास २००१ रुपये व तिसर्या क्रमांकाच्या मल्लास १०११ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त अन्य १००१ रुपयाच्या ५ कुस्त्या होतील तर ७०१ रुप्याच्या तीन कुस्त्या तर ५०१, १५१ च्या कुस्त्या खेळल्या जातील असेही संयोजक व गावकऱ्याच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.  या यात्रा महोत्सव व हनुमान जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन श्री, मारोती मंदिर कमेटी व श्री चैतन्य सांप्रदाय प्रसार संस्था उपशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी