शिवणी। किनवट तालुक्यातील शिवणी येथे आज दि.१० एप्रिल पासून ते १७ एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शिवणी गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.गावकरी व हनुमान मंदिर संस्थान कमिटीच्या वतीने श्रीराम नवमी ते हनुमान जयंती पर्यंत होत असलेल्या १९ व्या अखंड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात श्रीराम नवमी निमित्त जन्मोत्सव व विना पारायण, गीता पारायण, काकडा आरती,श्रीमत ग्रंथ राज ज्ञानेश्वरी,रामायण कथा, हरिपाठ,व दि.१० ते १७ एप्रिल पर्यंत सतत सात दिवस एकूण सात ह.भ.प.कीर्तनकार अनुक्रम प्रमाणे पहिल्या दिवशी मारोती महाराज दिग्रस्कर,माऊली महाराज सकरेकर,ओम सतीताई विरसनी, मैणाताई हिपळणारीकर,बालयोगी गजेंद्र महाराज,विद्याताई चातारीकर व शेवटी १७ रोजी काल्याचे कीर्तन ह.भ.प. भीमराव महाराज फुटाणकार यांच्या श्रीमुखातुन काल्याचे कीर्तन व प्रबोधन झाल्यावर महाप्रसादाचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे माहिती हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष हणमंतु कटकेमोड, व माजी अध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष बालगंगाराम भुशिवाड सचिव किशन वानोळे सह गावकऱ्यांनी माहिती दिली.
मागील तीन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे व शासनाच्या विविध निर्बंधांमुळे श्रीराम नवमी अखंड हरिनाम सप्ताह,हनुमान जन्मोत्सव साजरे करता आले नाही.तर मागील काही दिवसापासून कोरोना संबंधित सर्व नियम संपुष्टात आणून मास्क मुक्त महाराष्ट्र झाल्याने गावकऱ्यांनी सप्ताह निमित्त कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. तर शिवणी व पंचक्रोशीतिल वाडी तांड्यातिल भाविकांनी अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही मंदिर कमिटी च्या वतीने करण्यात आले.