डॉक्टर, इंजनियर, विविध व्यक्तीमत्व घडविणारे आदर्श शिक्षक श्री कंठाळे सर -NNL


शिक्षक मेणबत्तीसारखे प्रकाश देतात. शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना योग्य - अयोग्य आणि चांगले - वाईट यात फरक करण्यास शिकवितात. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ विषयांचे ज्ञान देत नाही, तर जीवनात एक चांगला आणि खरा माणूस बनण्यासाठी प्रेरणा देतो. असेच कार्य हिमायतनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री विश्वनाथ बुधाया कंठाळे यांच कार्य आहे. त्यांनी सेवा काळात अनेक व्यक्तीमत्व घडविले असून, बालवयापासून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी चालविलेली धडपड यामुळेच अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन यशो शिखरावर पोहचले आहेत. अश्या गुरुवर्य शिक्षकास ७५ व्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा

आदर्श शिक्षक श्री विश्वनाथ बुधाया कंठाळे सरांचा जन्म २० मार्च १९४७ रोजी हदगाव येथे झाला. त्यांनी सण १९६५ मध्ये दहावीचं शिक्षण घेऊन शिक्षक पात्रतेची पदवी मिळविली. जुलै १९६७ साली त्यांची शिक्षक म्हणून हदगाव तालुक्यातील बेलगव्हाण येथे नेमणूक झाली. त्यांनी सेवा काळात अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देऊन सक्षम बनविले. एवढच नाहीतर वर्गातील हुशार विद्यार्थ्यांवर ते व्यक्तीक लक्ष दिल्यामुळे आज अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, राजकीय नेते, पत्रकार उद्योजक, विविध क्षेत्रातील अधिकारी नामवंत झाले आहेत. त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याची दखल घेऊन सण १९९१ मध्ये तालुका गुरु गौरव पुरस्कार आणि १९९७ मध्ये जिल्हा गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

श्री विश्वनाथ बुधाया कंठाळे सर नुसते शिक्षकच नव्हते तर ते एक प्रवचनकारही आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले... त्या परिसरातील नागरिकांना कंठाळे सरानी रामायण, महाभारत, भागवत यासह वेगवेगळ्या पद्धतीने अध्यमाच्या माध्यमातून सांस्कृत भाषेतील मराठी अनुवाद करून हजारो भाविक- भक्त श्रोत्यांना भक्तीचा मार्ग दाखविला. धार्मिक कार्याबरोबर त्यांनी शिक्षकी सेवा काळ संपल्यानंतर अल्पबचत गुंतवणूक, पोस्टातील इतर सेवा १९८९ ते २००५ पर्यंत नागरिकापर्यंत पोचवून गुंतवणुकीचे फायदे व महत्व पटवून दिले. त्याच बरोबर ते स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळी आहे. असा शिक्षक, प्रवचनकार, आणि सामाजिक कार्यात स्वःताला वाहून घेणाऱ्या शिक्षकाचा मर्यादापुरोषोत्तम प्रभू श्रीराम नवमीच्या दिनी वाढदिवस येणे हा योगायोग असून, शिक्षक आणि विद्यार्थी यातील मर्यादा ना ओलांडलेल्या गुरुवर्य कंठाळे सर यांना नांदेड न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने खूपखूप शुभेच्छा. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी