भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मौजे बोरगाव तेलंग येथे सार्वजनिक जयंती व व्याख्यान -NNL


नांदेड।
बोरगाव तेलंग ता जि नांदेड दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी  भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जयंती सोहळा व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

 या  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम.के.क्षिरसागर हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. इरवंत सुर्यकार जिल्हा संघटक तथा तालुका व्यवस्थापक उमेद अभियान पंचायत समिती नांदेड त्याच बरोबर  मा.आयु. धम्मरत्न वायवळ, (राजपत्रित अधिकारी शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन) या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावचे सरपंच मा. अनिल पाटील क्षिरसागर, सिद्धार्थ सावंत (आर्मी ऑफिसर) रामदिनवार सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बोरगाव तेलंग, सुमेध भन्ते,सुनंद भन्ते, 

तालुका व्यवस्थापक धम्मदीप सिरसे ,उद्धवराव क्षीरसागर ,गंगाधर निवडूंगे वच्‍छलाबाई निवडूंगे, (ग्रामपंचायत सदस्या) राजू कंधारे, (ग्रामपंचायत सदस्य) , मारोती कंधारे ,विशाल खंदारे, आनंद खंदारे, नरोजी कंधारे, उमेदच्या प्रेरीका अर्चना निवडुंगे, संगीता कंधारे ,आशा वर्कर गंगुबाई निवडुंगे, अंगणवाडी सेविका नेमाबाई कंधारे ,कॉम्रेड लताताई गायकवाड,भारत सावंत,विशाल सावंत,  गजानन कंधारे, गोविंद जाधव, विशाल अंधारे नरेंद्र निवडंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे उकृष्ठ सूत्रसंचालन मा.प्रा.संतोष शिंदे यांनी केले तर आभार अभिजित निवडुंगे यांनी मांडले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी