आरोग्यावर परिणाम
एप्रिल महीन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून अत्यंत कडक उन्ह पडत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना वीज पुरवठा किंवा गायब होईल हे सांगता येत नाही.जर वीज पुरवठा दिवसा किंवा दुपारी रात्री ला गायब झाला तर नागरिकांच्या जीवाची घालमेल होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना चालू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना मोठी कसरत घ्यावी लागत आहे.
गेल्या आठवड्यापासून दिवसा अतिक्रमण तापमान पडत आहे तर रात्रीला पहाटे थंडी जाणवत असल्याने थंडीत गरम वातावरणाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन ते आजारी पडत आहेत. दिवसभर वाढत्या उन्हाचा त्रास, रात्री डासांचा वाढता हल्ला यामुळे उष्णतेचे आजार व ताप, सर्दीमुळे गावकरी हैराण झालेल्या अवस्थेत आहेत. विजेच्या भारनियमनामुळे लहान मुलांची तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नेहमी वेळेवर वीजबिल भरणारे वीज ग्राहकांना भर उन्हाळ्यात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उन्हाच्या तिव्रतेमुळे शेतातील हळद काढणी शिजवून वाळवणे कामे करताना शेतकरी बांधवांना त्रासदायक होत आहे. शेतातील बोअरवेलमध्ये पाणी असूनसुद्धा विज भारनियमनामुळे जनावरांची तहान कशी भागवावी असा प्रश्न शेतकरी मंडळी समोर उभा असल्याचे चित्र आहे. सकाळी आठ वाजता कडक उन्हाळा सुरू होतो. सायंकाळी ७ नंतर थोडे थंड वाटू लागले की वीजपुरवठा भारनियमनामुळे खंडीत होतो. दिवसभर अंगाची लाहीलाही पाहता रात्री झोप सुद्धा व्यवस्थितपणे मिळत नाही. परिणामी आरोग्य बिघडत चालल्यामुळे मनस्ताप वाढत असल्याचे दिसून येत आहे.