युनोच्या वतीने 1995 रोजी सर्वप्रथम जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. तर 2001 साली सर्वप्रथम भारतात पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने जगातील लोकांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी. व तसेच जगातील साहित्यिकांचा व त्यांच्या साहित्याचा बहुमान व्हावा. या साठीच जागतिक दिन म्हणून संपूर्ण जगासह भारतामध्ये साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात ग्रंथप्रदर्शन सोहळा घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते या लाभल्या होत्या तर या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून प्रत्यक्ष ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल बोंबले राजू यांनी मानले.