नांदेड| उदगीर येथील रंगकर्मी साहित्य, कला, आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे विविध क्षेञातील पुरस्कार नुकतेच एका भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. 10 एप्रिल 2022 रोजी उदगीरात या पुरस्काराचे वितरण रघुकूल मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
मानपञ, गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून सैराट, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, मुळशी पॅटर्न आदि चित्रपटातील सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि वासुदेव बळवंत फडके, मेनका उर्वशी, हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातील तसेच सही रे सही, टुरटुर या नाटकातील प्रसिध्द अभिनेते विजय कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. काही अपरिहार्य कारणास्तव डॉ. ज्योती कदम या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वाती शिंदे यांनी स्वीकारला.
डॉ.ज्योती कदम यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या बालकवितेचा समावेश इयत्ता सहावी सुगमभारती मध्ये करण्यात आलेला आहे. कलर्स दूरचित्रवाणी वाहिनी आणि दै. लोकमततर्फे आयोजित परिवर्तन द न्यू एज वुमन या महिला अधिवेशनासाठी पुणे येथे त्यांना आंमत्रित करण्यात आले होते. अनेक नामवंत दैनिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. विविध आकाशवाणी केंद्रांवर त्यांचे काव्यवाचन प्रसारीत झाले आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन झालेले आहे. त्यांच्या या साहित्यसेवेसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड व अन्य पदाधिकार्यांनी दिली.