सोशल मिडीयावर नकली हत्यारे, पिस्टल, खंजर, तलवारासह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्यावर कार्यवाहीचा बडगा -NNL

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशाने गुन्हेगारांत घाबरहाट; अनेकांना अटक व कार्यवाही 


नांदेड|
शहरामध्ये सध्या सोशल मिडीयावर नकली हत्यारे, पिस्टल, खंजर, तलवार, हत्यारासह फोटो काढुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्याचे प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक, नांदेड प्रमोद शेवाळे यांनी अश्या प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांचा शोध घेवून कायदेशीर कार्यवाही करण्याचे व त्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जारी केले आहेत.

त्या आदेशानुसार विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे, सपोनि गिरीव त्यांचे विशेष पथकाने आरोपी नामे 1) प्रमानंद राजु नरवाडे वय 20 वर्षे रा. इचलकरंजी जि. सोलापुर ह.मु. आशिर्वादनगर नांदेड 2) विशाल अनंतराव कांबळे वय 18 वर्षे रा. शिवनगर, नांदेड 3) रितेश दिपक पंडीत वय 18 वर्षे रा. सिध्दार्थ नगर तरोडा बु. नांदेड व 3 अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेवून त्यांचे कडुन तिन नकली पिस्टल जप्त करुन कायदेशीर कार्यवाही केली आहे. याबाबत पोस्टे विमानतळ गु.र.नं. 143/2022 कलम 6 /25 भाहका सहकलम 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन विधी संघर्ष बालकावर नियमानुसार कार्यवाही करुन सोडण्यात आले. सदर कार्यवाहीत सपोनि श्री गिते, पोह दारासिंह राठोड, पोना कलंदर यांनी सहभाग घेतला.

तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, निलेश मोरे, पोनि नितीन काशीकर, सपोनि रवि वाव्हुळे, डी.बी. पथक, आर.सी.पी. अंमलदार यांच्यासह पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीमध्ये नानानानी पार्क, नवामोंढा परीसर, वसंतनगर, खोब्रागडे नगर, इत्यादी भागामध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणारे गोंधळ घालणारे अकरा टारगट लोकांवर कार्यवाही करुन कलम 110/117 मपोका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच विशेष मोहिम राबवून रेकॉर्डवरील सहा आरोपी चेक करण्यात आले.

नाकाबंदी दरम्यान 69 वाहन चेक करुन 26 वाहनावर मोवाका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली 3 वाहन डिटेन करुन पोस्टेला लावण्यात आले, हद्दीतील ढाबे चेक करण्यात आले. नांदेड पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, लोकांनी विनाकारण अवेळी, रात्री बेरात्री रस्त्यावर फिरुनये, बेशिस्त वाहन रस्त्यावर लावूनये रस्त्याने चालताना लोकांनी मोवाका चे तंतोतंत पालन करावे पालन न केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तसेच हत्यारासह, नकली हत्यारासह फोटो, व्हिडोओ किंवा मजकुर सोशल मिडीयावर प्रसारीत केल्यास सायबर शाखा व नांदेड पोलीस दलातर्फे लक्ष ठेवून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोनि अनिरुध्द काकडे, पोस्टे विमानतळ, पोनि नितीन काशीकर, पोस्टे शिवाजीनगर, व त्यांचे विशेष पथक यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी